आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसची धर्मनिरपेक्षता अाता २०१९ च्या निवडणुकीत समजेल : प्रकाश आंबेडकर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कर्नाटक निवडणुकीत डाव्यांनी चार जागा मागितल्यानंतरही आम्हाला कोणाची गरज नसल्याचे सांगत काँग्रेसने त्या दिल्या नाहीत. त्यामुळे काँग्रेसची धर्मनिरपेक्षता २०१९ च्या निवडणुकीत समजेल, असे मत भारिपचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केेले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राज्यभरात मेळावे घेण्यात येत असून लोकसभेसाठी १२ जागा आघाडीकडे मागितल्याचे ते म्हणाले. 


सोमवारी मौलाना आझाद रिसर्च सेंटरमध्ये मेळावा घेण्यात आला. या वेळी माजी आमदार लक्ष्मण माने, हरिभाऊ भदे तसेच अमित भुईगळ, विजय मोरे, उद्धव बनसोडे आदी उपस्थित हाेते. आंबेडकर म्हणाले, लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून १२ जागा काँग्रेसकडे मागितल्या आहेत. त्यांनी त्या दिल्या तर त्यांच्यासोबत जाऊ अन्यथा स्वतंत्र लढण्याचा पर्याय आमच्यासमोर आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करणार नाही. एमआयएम देखील आघाडीसाठी पर्याय असू शकतो. संतांपेक्षा मनू श्रेष्ठ असल्याच्या भिडे यांंच्या वक्तव्याचा त्यांनी निषेध केला. ओबीसी समाजानेही याचा निषेध करावा. मुस्लिम समाजाने आता आत्मपरीक्षण करावे. तुमच्याकडे माणसे आहेत, काम करून घेता आले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. माने म्हणाले, प्रकाश आंबेडकर आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत. विधानसभेत ७० ते ८० जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. एवढ्या जागा आल्यास आमचा मुख्यमंत्री होऊ शकतो. 


घराणेशाहीच्या राजकारणास आमचा विरोध 
चंद्रपूर, वर्धा, अमरावती, परभणीसह अनेक ठिकाणी घराणेशाहीचे राजकारण सुरू असून, आमचा त्याला विरोध आहे. शरद पवारांविषयी ते म्हणाले, पवार कधीच शेतकऱ्यांचे नेते नव्हते. ते पुरोगामी आणि प्रतिगामीदेखील असल्याचा टोला त्यांनी लगावला. 

बातम्या आणखी आहेत...