आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आत्महत्येऐवजी 'स्मार्ट विचार' करणाऱ्या शेतकऱ्यांनी अवघ्या 7 एकरांतून मिळवले 50 लाखांचे उत्पन्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगााबाद- एकीकडे कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना शहरापासून अवघ्या २० किमीवरील औरंगपूर या लहानशा गावातील नऊ शेतकऱ्यांनी सात एकरात भाजीपाला पिकांच्या बीजोत्पादनातून यंदा ५० लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या मराठवाड्यातील या शेतकऱ्यांचा हा यशस्वी बीजोत्पादनाचा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी मोठा प्रेरणादायी आहे. 


औरंगपूरमधील नऊ शेतकऱ्यांनी बीजोत्पादक कंपन्यांशी थेट संपर्क केला. म्हणजेच जे पिकवणार आहोत, त्यासाठी सर्वप्रथम बाजारपेठ आणि मिळणारा भाव याबाबत आधी नियोजन केले. त्यांच्याशी करारही केला. त्यानंतर बीजोत्पादन लागवडीला प्राधान्य दिले. कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या मदतीने सर्व मिळून एकूण सात एकरांवर त्यांनी टोमॅटो, मिरची, टरबूज, खरबूज यांची लागवड केली. त्यातून केलेल्य बीजोत्पादनातून त्यांना या वर्षी पन्नास लाखांचे उत्पन्न मिळाल्याचे नामदेव डिडोरे पाटील, जगन्नाथ डिडोरे, जगन्नाथ तायडे या बीजोत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. 


बेरोजगारांच्या हाताला काम
बीजोत्पादनाची शेती हे खूप मेहनतीचे व परिश्रमाचे काम आहे. तायडे यांच्याकडे २३ बेरोजगारांना काम मिळाले तर सर्व मिळून वर्षभरात ७० मजुरांच्या हाताला हंगामानुसार काम मिळते. विशेष म्हणजे गावात मजूर मिळत नाही म्हणून शहरातून ऑटोरिक्षात मजुरांना घेऊन जाणे व आणून सोडण्याचे कामदेखील शेतकरी करतात. 

 

बीजोत्पादन व्यवस्थापन 
गांडूळ, सेंद्रिय खतांबरोबरच रासायनिक खतांचा समतोल वापर, कंपनीकडून बीज बियाण्याची लागवड व लागवडीनंतरचे सर्वांनी शेडनेट उभारून नियंत्रित शेतीचा अवलंब केला. पावसाच्या पाण्यातून जलपुनर्भरणास महत्त्व दिले. शेततळे, विहीर, बोअरवेलमधील उपलब्ध पाण्याचा काटकसरीने पिकांच्या गरजेनुसार वापर करून पावसाच्या खंडात, दुष्काळ, नैसर्गिक आपत्तीत बीजोत्पादनाला जगवले. विक्री व्यवस्थापनाद्वारे मधल्या दलालीला संपुष्टात आणून थेट शेतमालाला दर मिळवला. म्हणजेच बाजारात होणारी पिळवणुकीला कायम मूठमाती दिली. 
भाजीपाला बीजोत्पादनाला प्राधान्य : सिमला, तिखट आदी प्रकारची मिरची, टोमॅटो हे बीजोत्पादनातील नगदी पीक मानले जाते. याचबरोबर भेंडी, वांगी, कारले, टरबूज, खरबूज, दोडका, गिलके, भोपळा, काकडी बीजोत्पादकडे शेतकरी वळाले आहेत. 


नामदेव डिडोरे, निवृत्ती डिडोरे, ज्ञानेश्वर डिडोरे 
टरबूज २० गुंठ्यात ३० किलो, सिमला मिरची १० गुंठे : ५ किलो , तिखट मिरची : २० गुंठे : ८० किलो, टोमॅटो १० गुंठे : १८ किलो, जाड मिरची २० गुंठे : ३५ किलो असे दोन एकरावर १ क्विंटल ६८ किलो उत्पादन झाले आहे. १० लाख रुपये उत्पन्न मिळाले. ९० लाख लिटर पाणी क्षमतेचे शेततळे आहे. २५ टक्के पाणी शिल्लक. 


आबा डिडोरे 
मिरची २० गुंठे १ क्विंटल, टोमॅटो १० गुंठ्यात १८ किलो खर्च वजा जाता सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ६५ लाख लिटरचे शेततळे आहे. 


नंदू डिडोरे जगन्नाथ डिडोरे 
४० गुंठे : मिरची २ क्विंटल, खरबूज ४० किलो, टरबूज २० किलो एकूण खर्च वजा जाता १० लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. ६५ लाख लिटरचे शेततळे आहे. सध्या ५० टक्के पाणी उपलब्ध आहे. 

बातम्या आणखी आहेत...