आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ गायिका आशालता करलगीकर यांचे निधन; चतुरस्त्र गायकीचा झरा हरपला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-  प्रसिद्ध सुगम व शास्त्रीय गायिका आंध्रलता आशालता करलगीकर (७५) यांचे शनिवारी येथे खासगी रुग्णालयात निधन झाले. प्रतापनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


वैजापूरला २० नोव्हेंबर १९४२ ला जन्मलेल्या आशालता यांचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण हैदराबादेत झाले. महामहोपाध्याय पं. स. भ. देशपांडे, डॉ. एन. के. कऱ्हाडे, पं. व्ही. आर. आठवले, पं. मधुसूदन भावे, पं. एस. ए. महाडकर आणि एन. बी. पटेल यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. भारतात संगीत क्षेत्रात अखिल ३ राष्ट्रीय पुरस्कारांच्या मानकरी असलेल्या त्या पहिल्या गायिका होत्या. अफगाणिस्तानातील काबूल शहरात ११ कार्यक्रम त्यांनी केले होते. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना आंध्रलता संबोधले होते. सूरमणी आणि सूरश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...