आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नाचे आमिष दाखवत घातले बेन्टेक्सचे मंगळसूत्र, खोटा पती बनून केले असे काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- लग्नाचे आमिष दाखवून युवकाने तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. ३० जून २०१७ ते २१ जानेवारी २०१८ दरम्यान ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, अमोल शिवाजी सोनटक्के (२८, रा. भोईवाडा) असे अत्याचार करणाऱ्याचे नाव आहे. 

 

सोनटक्के याची फोनवरून पीडितेसोबत ओळख झाली. त्याने लग्नाचे आमिष दाखवत खोटे लग्न करून बेन्टेक्सचे मंगळसूत्र घातले. त्यानंतर सोनटक्के याने पीडितेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नातलगांसमोर लग्न करण्याचा आग्रह धरला असता त्याने तिला मारहाणही केली. तगादा लावल्यावर त्याने लग्न करण्यास नकार दिला. पीडितेच्या तक्रारीववरून सिटी चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक निरीक्षक जानकर तपास करीत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...