आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापुरात शिवसेनेला बहुमत, नगराध्यक्षपद मात्र भाजपकडे; भाजप-मित्रपक्षांची मुसंडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अाैरंगाबाद/ जळगाव - राज्यातील सहापैकी दाेन नगरपालिका व चार नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजप व मित्रपक्षांनी बाजी मारली अाहे. जामनेर नगरपालिकेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली सर्वच्या सर्व २४ जागा भाजपने जिंकल्या. महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. अाजरा, देवरुख या नगरपंचायतीतही भाजपची सत्ता अाली. गुहागर नगरपंचायतीत शिवसेनेच्या नेतृत्वाखालील अाघाडीने यश प्राप्त केले, तर कणकवलीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाने वर्चस्व मिळवले. अाैरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर पालिकेत शिवसेनेला बहुमत मिळाले असले तरी नगराध्यक्षपदी भाजपच्या उमेदवार विजयी झाल्या.  


जामनेर (जि. जळगाव) पालिका अध्यक्षपदी  भाजपच्या साधना महाजन यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवार प्रा. अंजली पवार यांचा ८ हजार ३५३ मतांनी पराभव केला. महाजन यांना १७ हजार ८९३ मते मिळाली, तर प्रा. पवार यांना ९ हजार ५४० मते मिळाली. नगरसेवकपदाच्या सर्व २४ जागा भाजपने जिंकल्या. इतर पक्षांना एकही जागा मिळू शकली नाही.  वैजापूर (जि. अाैरंगाबाद) पालिकेत २३ पैकी १३ जागा मिळवत शिवसेनेने बहुमत मिळवले. पण नगराध्यक्ष निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. भाजपच्या उमेदवार शिल्पा दिनेश परदेशी पुन्हा नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या. मागच्या वेळी काँग्रेसकडून नगराध्यक्षपद भूषवलेल्या परदेशी यांनी निवडणुकीच्या ताेंडावर भाजपमध्ये प्रवेश केला हाेता. शिवसेनेच्या उमेदवार सय्यद तशफा यांचा त्यांनी २०७३ मतांनी पराभव केला. भाजपचे ९ व काँग्रेसचा एक नगरसेवक विजयी झाला.  


देवरुखमध्ये भाजप- मनसे- रिपाइंची सत्ता   

देवरुख (जि. रत्नागिरी) नगरपंचायतीत शिवसेना व राष्ट्रवादीचा पराभव करून भाजपच्या मृणाल शेटे विजयी झाल्या. भाजपची रिपाइं व मनसेसाेबत अाघाडी हाेती. या ठिकाणच्या १७ पैकी सर्वाधिक ७ जागा भाजपने, तर एक जागा मनसेने जिंकली. शिवसेनेला चार जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसला तीन, तर काँग्रेसला १ जागा मिळाली. एक अपक्ष उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आला आहे.  


भास्कर जाधवांना धाेबीपछाड
गुहागर (जि. रत्नागिरी) नगरपंचायतीत शहर विकास आघाडी आणि शिवसेनेने राष्ट्रवादीचे अामदार, माजी मंत्री भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा धुव्वा उडवला. शहरविकास अाघाडीचे ९, शिवसेनेचा १ असे १० उमेदवार विजयी करत अाघाडी- शिवसेनेने सत्ता प्राप्त केली. पूर्वाश्रमीचे राजेश बेंडल हे अाघाडीचे उमेदवार नगराध्यक्षपदी विजयी झाले. भाजपला सहा, तर राष्ट्रवादीला एकाच जागेवर समाधान मानावे लागले.  


अाजऱ्यात भाजप- ताराराणी अाघाडीला यश 

आजरा (जि. काेल्हापूर) नगरपंचायतीवर भाजप व ताराराणी अाघाडीप्रणीत शहर विकास आघाडीने एकूण १७ पैकी १० जागा जिंकत बहुमत मिळवले. राष्ट्रवादीला ३, काँग्रेसला २, तर शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले. परिवर्तन आघाडीचाही एकच उमेदवार विजयी झाला.  शहर विकास अाघाडीच्या जाेत्स्ना अशाेक चराटी ंयांनी राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेच्या संयुक्त उमेदवार अलका जयवंत शिंपी यांचा १५०६ मतांनी पराभव केला.  

बातम्या आणखी आहेत...