आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतक-यांच्या मागण्यांसाठी परभणीत शिवसेनेचे चक्काजाम आंदोलन, वाहनांच्या लागल्या रांगा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे. - Divya Marathi
खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे.

परभणी- रिलायंस कंपनी आणि कृषी विभागकडून शेतक-यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध तसेत शेतक-यांच्या इतर मागण्यांसाठी शिवसेनेने परभणीत खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु केले आहे. याची सुरवात शनिवारी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात रास्ता रोको आंदोलनाने होत आहे. आंदोलकांनी आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी टायर जाळून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला. यामुळे आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

 

खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना न मिळालेला पिक विमा, बोंड अळी व गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही न मिळालेले अनुदान यासह शेतकऱ्यांचे विविध प्रश्‍न सोडवण्यासाठी परभणी जिल्ह्यात आंदोलन सुरु करण्यात आले आहे. यात शिवसैनिकांबरोबरच शहरात शेतक-यांनीही मोठ्या संख्येने भाग घेतला आहे. परभणी शहरात येणारे चारही रस्ते चक्काजाम आंदोलनामुळे बंद झाले आहेत. अनेक ठिकाणी वाहतुक खोळंबली आहे. 

 

पुढील स्लाईडवर पहा आंदोलनाचे आणखी काही फोटोज....

बातम्या आणखी आहेत...