आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवशाही बस रस्त्याच्या खाली घसरली, २८ प्रवासी बचावले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- भुसावळवरून औरंगाबादकडे येणारी शिवशाही वातानुकूलित बस सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास हर्सूल येथील साकला नर्सरीजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या खाली घसरली. यात वाहक संतोष जाधव आणि प्रवासी जोशी यांना किरकोळ मार लागला. त्यांना उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. बसमध्ये २८ प्रवासी होते. 


मध्यवर्ती आगारातील एमएच ०६, बीयु ९९६ क्रमांकाची शिवशाही बस भुसावळ येथून येत होती. साकला नर्सरीजवळ चालक विशाल सावंत यांचे बसवरील नियंत्रण सुटले. बस रोडवरून खाली पाच फूट घसरल्यानंतर चिखलात जाऊन फसली. यात काही प्रवाशांना मुका मार लागला. बस खड्ड्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

बातम्या आणखी आहेत...