आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीरामकृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन योजना पुन्हा कार्यान्वित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - वैजापूर तालुक्यातील श्रीरामकृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यास मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. योजना कार्यान्वित करण्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निधीतून ५ कोटी ७९ लाख   देण्यासही  मान्यता दिली आहे.  


वैजापूर तालुक्यातील १६ गावांतील शेतकऱ्यांनी जायकवाडी प्रकल्पाच्या जलाशयातून शेतीसाठी पाणी आणण्यासाठी ही संस्था स्थापन केली होती. नाबार्ड व औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या अर्थसहाय्यातून १९९३ मध्ये ही योजना कार्यान्वित झाली होती. त्यानंतर १९९४-९५ व १९९५-९६ या दोन वर्षांत अनुक्रमे ७५५ व ९७ हेक्टर क्षेत्राचे सिंचन करण्यात आले होते. त्यानंतर विविध कारणांमुळे ही योजना बंद आहे. या अगोदर नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील अशा प्रकारे बंद असणाऱ्या उपसा सिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

 

४ हजार ४०० हेक्टरचे सिंचन
ही योजना पुन्हा कार्यान्वित झाल्यास सुमारे ४ हजार ४०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊन शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या योजनेची उपयुक्तता लक्षात घेऊन श्रीरामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेचे टप्पा क्र. १ व २ (प्रत्येकी दोन पंप) कार्यान्वित करण्यासाठी यांत्रिकी, विद्युत व स्थापत्य कामांच्या अंदाजपत्रकानुसार पाच कोटी ७९ लाख इतका निधी जलसंपदा विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  

 

बातम्या आणखी आहेत...