आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रुती भागवत खुनाचा तपास करण्यास सीआयडी असमर्थ; पुरावेच सापडत नसल्याने तपास गुंडाळला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सहा वर्षांपूर्वी शहरात झालेल्या श्रुती भागवत खून प्रकरणाचा तपास गुंडाळण्यात येत असून सारांश अहवाल सीआयडीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केला आहे. पुरावे सापडत नसल्याने तपास बंद करत असल्याचे त्यात नमूद केले आहे. 


श्रुती भागवत खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने ८ मार्च २०१७ रोजी दिले होते. त्यानुसार गेल्या सव्वा वर्षापासून सीआयडी या खुनाचा तपास करत होते. उल्कानगरी या उच्चभ्रू वसाहतीतील श्रीनाथ अपार्टमेंटमध्ये श्रुती विजय भागवत यांचा १७ एप्रिल २०१२ रोजी मध्यरात्रीनंतर अज्ञात मारेकऱ्यांनी खून केला. मृतदेह एका गादीमध्ये गुंडाळून पेटवून दिलेल्या अवस्थेत आढळून आला होता. श्रुती भागवत यांचे पती विजय हे दुबईत, तर मुलगा पुणे येथील कंपनीत नोकरीला आहे. त्यामुळे श्रुती भागवत एकट्याच राहत होत्या. भागवत यांच्या खुनाला पाच वर्षे झाली. तरीही जवाहरनगर पोलिस, गुन्हे शाखा व एसआयटीकडून तपासाचा उलगडा करण्यात अपयश आले. त्यामुळेच गेल्या वर्षी श्रुती यांचा भाऊ मुकुल करंदीकर यांनी प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांना वगळून अन्य तपास यंत्रणेकडे द्यावा, अशी विनंती करणारी याचिका याचिका दाखल केली. या घटनेचा तपास तत्काळ राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करावा. हा तपास सीआयडीच्या औरंगाबादच्या पोलिस अधीक्षकांच्या अधिपत्याखाली करावा. त्यावर सीआयडीचे विशेष पोलिस महानिरीक्षक (पुणे) यांनी प्रत्येक १५ दिवसांचा आढावा घ्यावा, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. 


पुरावेच सापडत नसल्याने तपास गुंडाळला 
तपासात पुरावे सापडत नसून त्यामुळेच सारांश अहवाल (समरी रिपोर्ट) दाखल केला आहे. सीआयडीच्या ४ वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी या खुनाचा तपास केला. त्यात अधीक्षक शंकर केंगर यांचाही समावेश होता, असे खंडपीठात दाखल केलेल्या पत्रात म्हटले आहे. भविष्यात या खुनाचा तपास लागणार नसल्याचे करंदीकर यांचे वकील अभयसिंह भोसले यांनी सांगितले. 

 

बातम्या आणखी आहेत...