आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातून मेहरमशिवाय सोळा महिला हज यात्रेला;सबसिडी मुळे 22750 रुपये अतिरिक्त खर्च

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - यंदा हज यात्रेसाठी अर्ज केलेल्या ४३७३९ इच्छुकांपैकी प्राथमिक फेरीत राज्यातून ८४५ जणांना संधी मिळाली. यंदा नवीन नियमानुसार बगैर मेहरम (एकटी महिला) महाराष्ट्रातून १६ महिला यात्रेसाठी जाणार आहेत. यात बीड जिल्ह्याच्या ४ महिलांचा समावेश आहे. 


महाराष्ट्र राज्य हज कमिटी व खिदमत-ए-हुज्जाज कमिटीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत हज कमिटीचे कार्यकारी अधिकारी इम्तियाज काझी म्हणाले की, साधारण ११ ऑगस्टला  पहिला जथ्था यात्रेसाठी रवाना होईल. २०१७ मध्ये २०४९०० रुपये खर्च होत होते. २०१८ मध्ये जीएसटीमुळे हा खर्च प्रतिव्यक्ती २२९६६० रुपये होत आहे. 

 

महिलांबाबतचा नवा नियम
पूर्वी महिलांना केवळ पिता, पती, मुलगा यांच्यासोबतच हज यात्रेसाठी जाण्याची मुभा होती. बगैर मेहरम म्हणजे इतर कोणत्याही व्यक्ती सोबत जाता येत नव्हते. परंतु नवीन नियमानुसार ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मुस्लिम महिला जाऊ शकतील. त्यासाठी किमान ४ महिला एकत्रित जाणे गरजेचे आहे. 

बातम्या आणखी आहेत...