आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वडिलांच्या खूनप्रकरणी मुलाची निर्दोष मुक्तता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद  - जालना जिल्हयातील आरोपी मुलाची वडिलाच्या खून प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. कर्णिक यांनी दिले. सरकार पक्षाला आरोपींनी खून केल्याचे सिद्ध करता आले नाही. तसेच एका साक्षीदाराची साक्षही ग्राह्य धरण्यास न्यायालयाने नकार दिला.  


भोकरदन तालुक्यातील सुतार पिंपळगाव येथील पुंजाराम मनारसे हे १ ऑक्टोबर २००७ रोजी घरातून बाहेर पडले. तेव्हापासून ते घरी परतले नाही. दरम्यान अजिंठा परिसरातील जंगलात एका व्यक्तीचे कुजलेले प्रेत आढळले. पुंजाराम यांचा भाऊ सोनाजी मनारसे याने पोलिसांत जबाब दिला की, पुंजाराम यांचा मुलगा भागाजी याने इतर सहा आरोपींशी संगनमत करुन मालमत्तेच्या वाटणीवरून वडिलांचा खून केला व अजिंठा घाटात वडिलांचे प्रेत फेकून दिले. प्रकरणात मुलासह इतर आरोपींना अटक करण्यात आली. सरकारी पक्षाने एकूण पाच साक्षीदार तपासले. आरोपीच्यावतीने अॅड. रवींद्र गोरे यांनी युक्तिवाद केला. त्यात घाटात सापडलेले प्रेत पुंजाराम याचे असल्याचा कुठलाही पुरावे उपलब्ध नाही. डी.एन.ए. चाचणी करण्यात आली नाही, असे मुद्दे त्यांनी मांडले.

बातम्या आणखी आहेत...