आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा रुपये कुठे गेले, असे विचारताच मुलाने आईच्या डोक्यात घातला खलबत्ता; मुलास अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पर्समधील १० रुपये कुठे गेले, असे आईने विचारल्यामुळे संतप्त झालेल्या सुशिक्षित मुलाने आईच्या डोक्यात खलबत्ता घातल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी दुपारी मुकुंदवाडीत घडला. याप्रकरणी पोलिसांनी अमोल शिवराम सानप (२७) या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

 

अमोलने बारावीनंतर फार्मसी विषयात डिप्लोमा (डीफार्म) केला आहे. डीफार्म झाल्यानंतर अमोलने पुढील शिक्षण घेतले नाही. तो कामही करत नव्हता. नोकरी करत नसल्याने अमोलचे घरचे त्याला कायम नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी आग्रह करत होते. यावरून त्यांच्यात वाद होत होते.


१६ जानेवारी रोजी दुपारी अमोलची आर्इ चंदा यांना त्यांच्या पर्समधील दहा रुपये आढळून आले नाही. त्यामुळे तू दहा रुपये घेतलेस का? असे त्यांनी अमाेलला विचारले. परंतु अमोलने याचा चुकीचा अर्थ घेत मला असे का विचारले? असे म्हणत वाद घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात जवळच असलेला खलबत्ता उचलून त्याने थेट आईच्या डोक्यात घातला. यात चंदा गंभीर जखमी झाल्या. कुटुंबातील इतर सदस्यांना हा प्रकार कळताच त्यांनी तत्काळ चंदा यांना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर मुकुंदवाडी पोलिसांनी चंदा यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्यांचा जवाब नोंदवत अमोलला अटक केली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत त्याच्या जामिनाची प्रकिया सुरू होती. उपनिरीक्षक अशोक शिर्के पुढील तपास करत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...