आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी त्याने उत्तरपत्रिकेत लिहिले चक्क \'व्हाय दिस कोलावरी डी\' साँग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- 'देवा मला पास कर, सर माझी परिस्थिती बिकट आहे. मला पास करा,' अशी विनंती विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेतच केल्याचे आढळून येते. परंतु यंदाच्या दहावीच्या परीक्षेत एका विद्यार्थ्याने चक्क 'मला व्हाय दिस कोलावरी डी... हे गाणे खूप आवडते. समोर आलेले पेपर पाहून मला तेच गाण आठवत आहे' असे नमूद करत हे पूर्ण गाणेच लिहिले आहे. 


अशा प्रकारे आक्षेपार्ह मजकूर लिहिणाऱ्या २३० विद्यार्थ्यांचा निकाल बोर्डाने राखीव ठेवला. गैरप्रकारांची चौकशीही केली. यात २०९ विद्यार्थ्यांचा समावेश असून या विद्यार्थ्यांना रस्टिकेट केले आहे. यात १ विद्यार्थ्यास एका परीक्षेस, २०२ विद्यार्थ्यांना वन + वन म्हणजेच मंडळाच्या दोन परीक्षांसाठी बंदी घातली आहे, तर एका विद्यार्थ्यास १+२ अशा तीन परीक्षांना बंदी, ५ परीक्षार्थींना वन + फाइव्ह अशा ६ परीक्षांवर बंदी घालण्यात आली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...