आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यायही समोर : प्रतीक्षा यादीतील कर्मचारी एसटी सेवेत घेण्याच्या हालचाली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या वेतनवाढीच्या निर्णयाला विरोध करत एसटी कर्मचाऱ्यांनी ८ व ९ जून रोजी संप पुकारला होता. एसटी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. एसटीमध्ये नव्याने रुजू झालेल्या राज्यातील ११०० वर कर्मचाऱ्यांना सेवामुक्ततेचा आदेश बजावला आहे. वेटिंग लिस्टमधील कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याच्या हालचाली एसटीने सुरू केल्या आहेत. मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेने या अन्यायकारक भूमिकेचा निषेध केला आहे. कोर्टातही दावा दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

 

दोन दिवस संप चालल्यामुळे एसटीचे १८ कोटींचे नुकसान 
वेतनकराराचा प्रश्न २६ महिन्यांहून अधिक काळ रखडला होता. यानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ४,८८९ कोटींचा वेतन करार घोषित केला होता. मात्र, कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यंानी अघोषित संप पुकारला होता. संपाच्या दोन दिवसांत एसटीचे १८ कोटी रुपयांचे नुकसान झाले. 


ही कारवाई नियमबाह्यच, आंदोलनही करू: संघटना 
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने या निर्णयाविरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला. संघटनेचे पदाधिकारी पी.टी.करवे म्हणाले, शिस्त व आवेदन कार्यपद्धतीच्या तरतुदीचा भंग करून काढलेले सेवामुक्तीचे आदेश नियमबाह्य आहे. यामुळे कामगारांत प्रशासनाविरुद्ध असंतोष निर्माण होऊ शकतो. 

बातम्या आणखी आहेत...