आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- मुदखेड ते नांदेड ३५० किमी, परभणी ते परळी ७८, मुदखेड ते अदिलाबाद १८० आणि पूर्णा ते अकोला रेल्वे विद्युतीकरण करण्यासाठी गुरुवारपासून इलेक्ट्रिफिकेशन फूट बाय फूट सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. प्रत्येकी पाच जणांचा समावेश असलेल्या ४ टीमकडून हे काम केले जात आहे. मुदखेड ते पूर्णा मार्गादरम्यान ७० किमीचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून उर्वरित सर्वेक्षण वीस दिवसांत पूर्ण करून तो अहवाल वरिष्ठांना सादर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
मराठवाड्यातील रेल्वे विकासाचा अनुशेष दूर करणे, जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ, औद्योगिक वसाहती, मेडिकल, शैक्षणिक हब, कृषी, बाजारपेठ, उद्योगाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे केंद्रस्थान असलेल्या आणि औरंगाबाद ही पर्यटन राजधानी असलेल्या नांदेड विभागातील रेल्वे विकास त्याच गतीने पूर्ण करण्यासाठी १९८० च्या पूर्वीपासून मराठवाडा रेल्वे विकास समिती, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी केंद्र, राज्य सरकार, रेल्वे बोर्ड प्रशासनाशी संघर्ष करत आहेत. त्याची दखल घेऊन मनमाड ते मुदखेड दुहेरी लाईन टाकणे, विद्युतीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याला खऱ्या अर्थाने ११ जानेवारीला गती मिळाली आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे महाप्रबंधक विनोदकुमार यादव यांनी रेल्वे विकासासाठी खासदारांची बैठक घेऊन त्वरित विद्युतीकरणासाठी काम सुरू करणार असल्याची ग्वाही दिली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी १२ जानेवारी रोजी नांदेड रेल्वे विभागात रेल्वे इलेक्ट्रिफिकेशनच्या फूट बाय फूट सर्व्हे ला सुरुवात करण्यात आली. या सर्व्हेमध्ये रेल्वे पूल, लेव्हल क्रॉसिंग, कर्व्ह(वळण), सिग्नल, पॉइंट अँड क्रॉसिंग, इत्यादी विषयीची सविस्तर माहिती घेतली जात आहे. जेणेकरून विद्युतीकरण कामास सुरुवात करता येईल.
मुदखेड ते पूर्णा सर्वेक्षण पूर्ण
सर्व्हेमध्ये प्रत्येकी ५ जणांच्या ४ टीम हे काम करत आहेत. यात मुदखेड ते पूर्णा हे जवळपास ७० किलोमीटरचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. काम पूर्ण झाल्यावर अहवाल वरिष्ठांना सादर केला जाऊन कामाचे टेंडर्स काढले जातील . सर्वेक्षणाच्या आधारे पेंगिंग प्लॅन बनवेल. तसेच महाट्रान्स्को लिमिटेड या विद्युत पुरवठा करणाऱ्या कंपनीला सब स्टेशन बनवणे, मेंटेनन्स डेपो बनवणे या कामांकरिता या सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे .
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.