आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिद्धार्थ उद्यानात हलवणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याचे काम प्रस्तावित असून उंची वाढवण्याचे काम पूर्ण होईपर्यंत हा पुतळा सिद्धार्थ उद्यानात हलवण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात या ३४ वर्षे जुन्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार असून प्रत्येक भाग तपासला जाणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी सांगितले. साधारणपणे जुलै महिन्यात कामासाठी निविदा जारी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर महिनाभराने प्रत्यक्ष काम सुरू होऊ शकते. म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या शेवटी हा पुतळा सिद्धार्थ उद्यानात हलवला जाऊ शकतो. 


मंगळवारी महापौरांच्या दालनात विविध पक्षांचे नेते व अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीस माजी आमदार प्रदीप जैस्वाल, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, गणेश महासंघाचे संस्थापक पृथ्वीराज पवार, माजी महापौर त्र्यंबक तुपे, मराठी क्रांती मोर्चाचे विनोद पाटील, अभिजित देशमुख, माजी महापौर भगवान घडमोडे, माजी उपमहापौर प्रमोद राठोड, राजू शिंदे, उपमहापौर विजय औताडे, स्थायी समिती सभापती राजू वैद्य, सभागृहनेते विकास जैन, राजगौरव वानखेडे, राजेंद्र जंजाळ, गोकुळ मलके यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. 


प्रत्येक भाग तपासणार 
३४ वर्षांपूर्वी हा पुतळा क्रांती चौकात बसला होता. आता त्याची उंची वाढवताना या पुतळ्याला काही झळ तर बसली नाही ना, याची तपासणी केली जाणार आहे. या पुतळ्याचा प्रत्येक भाग, अवयवाची तपासणी केली जाणार आहे. यापुढे त्याचे आयुर्मान किती असेल यासाठी स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल. आवश्यकता वाटल्यास लगेच दुरुस्ती केली जाणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...