आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तिच्या' सुसाइड नोटने बदलली तपासाची दिशा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- अविष्कार कॉलनी येथे गिझरमध्ये वीजप्रवाह उतरल्याने शॉक लागून पुष्पलता दत्तात्रय दहिवाळ (५२) या महिलेचा गुरुवारी (२१ जून रोजी) सकाळी ७ वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी पुढे तपास केला असता घटनास्थळी एक अर्धवट जळालेली सुसाइड नोट सापडली. 


शिवाय त्यांच्या अंगाचा रॉकेलचा वासही येत होता, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. याबाबत पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांना विचारले असता चिठ्ठी सापडली आहे, पण त्यात काय मजकूर आहे, हे अद्याप कळले नाही, पण चिठ्ठी वाचल्यानंतर तपास त्या दिशेने सुरू केला जाईल. त्याचबरोबर विजेच्या शॉकचा महावितरणकडून अहवाल मागवण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. पुष्पलता यांचे पती लाडगाव येथील दत्त दिगंबरपीठ मंडेलश्वर येथे मठाधिपती आहेत. 

बातम्या आणखी आहेत...