आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्तांनी मध्यरात्री पोलिस ठाण्यांना अचानक दिली भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पोलिस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर चिरंजीव प्रसाद यांनी शहराचा अभ्यास सुरू केला आहे. दोन दिवसांत प्रसाद यांनी मध्यरात्री शहराची पाहणी करत रात्रीचे ठाणे कसे चालतात, हेही पाहिले. बुधवारी रात्री त्यांनी सातारा, मुकुंदवाडी आणि पुंडलिकनगर ठाण्यांना भेटी दिल्या. 


सुरुवातीला प्रसाद यांनी उपायुक्त विनायक ढाकणे यांच्यासह मध्यरात्री शहरातील संवेदनशील भागांची पाहणी केली. त्यानंतर दोनदा खासगी कारमधून एकट्याने दिवसा आणि रात्री शहरात फेरफटका मारला. दंगलग्रस्त भागात सुरक्षेसाठी तैनात कर्मचाऱ्यांशीही त्यांनी अशाच पद्धतीने संवाद साधला. ठाण्यांना भेटी देताना प्रसाद यांनी ठाण्याची इमारत, शौचालय, फाइल्स, जप्त केलेल्या सामानाची खोली, अधिकाऱ्यांच्या केबिनची पाहणी केली. 

बातम्या आणखी आहेत...