आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षा भोगून बाहेर आलेल्या गुन्हेगाराने दारूसाठी मित्रावरच केला तलवारीने हल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गंभीर गुन्ह्यांमुळे स्थानबद्धतेची शिक्षा भोगून बाहेर आलेल्या गुन्हेगाराने दारूवरून झालेल्या वादात मित्रावरच तलवारीने वार केले. ५ जून रोजी सेंट्रल नाका परिसरात ही घटना घडली. अन्वर खान कादर खान (२३, रा. बारी कॉलनी, जिन्सी) असे जखमीचे नाव तर शेख इर्शाद शेख इब्राहीम (२५, रा. सावरकर चौक, आयपी मेससमोर) असे हल्लेखाेराचे नाव आहे. 


इर्शादवर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असून जिन्सी ठाण्याच्या हद्दीतील भाजीवाल्याचा खून प्रकरणातही तो आरोपी आहे. ५ जून रोजी इर्शादने अन्वरकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. त्याने नकार देताच इर्शादने तलवारीने वार केले. यात अन्वरचा पाय, पोटरीला गंभीर जखमा झाल्या. आवाज ऐकून स्थानिकांनी धाव घेतल्याने इर्शाद पसार झाला. अन्वरला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपनिरीक्षक दत्ता शेळके तपास करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...