आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक भरती : नोंदणीस २३ ऑगस्टपर्यंत मुदत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शाळांमध्ये ऑनलाइन पद्धतीने शिक्षक भरती करण्यात येत असून त्यासाठी "पवित्र' संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. भरतीसाठीची अभियाेग्यता आणि बुद्धिमापन चाचणी दिलेल्या उमेदवारांना २३ ऑगस्टपर्यंत नोंदणी करता येणार आहे. संकेतस्थळावर नोंदणी करण्यात अडचणी येत असल्याची तक्रार डीटीएड आणि बीएड झालेल्या तरुणांनी शिक्षण विभागाकडे केली होती. त्या तक्रारींची नाेंद घेण्यात आली असून उमेदवारांनी httpa://edustaff.maharashtr.gov.in/pavitra/user/login यावर परीक्षा क्रमांकानुसार माहिती भरायची आहे. नोंदणीचे वेळापत्रकही संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. 


असे आहे वेळापत्रक : ९ ते ११ जुलै - ५ हजार ते १५ हजार, १२ ते १५ जुलै - १५ हजार ते ३० हजार, १६ ते १८ जुलै - ३० हजार ते ४५ हजार, १६ ते १८ जुलैै - ३० हजार ते ४५ हजार, १९ ते २२ जुलै - ४५ हजार ते ६० हजार, २३ ते २५ जुलै दरम्यान ६० हजार ते ७५ हजार, २६ ते २९ जुलै दरम्यान - ७५ हजार ते ९० हजार, ३० जुलै ते १ ऑगस्ट - ९० हजार ते १ लाख ५० हजार, २ ते १२ ऑगस्ट पर्यंत १ लाख ५ हजार ते १ लाख ५० हजार,१३ ते १५ ऑगस्ट १ लाख ५० हजार ते १ लाख ६५ हजार, १६ ते १९ ऑगस्ट दरम्यान १ लाख ६५ हजार ते १ लाख ८० हजार, २० ते २३ ऑगस्ट दरम्यान १ लाख ८० हजार ते १ लाख ९९ हजार १४३ क्रमांक असणाऱ्यांना नोंदणी करता येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...