Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | tense situation in aurangabad after youth committed suicide for maratha reservation

तरूणाच्‍या जलसमाधीनंतर औरंगाबादेत तणावपूर्ण वातावरण, पुणे मार्गावरील वाहतूक ठप्‍प

प्रतिनिधी | Update - Jul 24, 2018, 09:48 AM IST

शहरातील क्रांती चौकात शेेकडो आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करून राजीनाम्याची मागणी केली.

 • tense situation in aurangabad after youth committed suicide for maratha reservation
  कोयगाव येथे तरुणाच्‍या जलसमाधीनंतर शहरातील क्रांती चौक येथे मोठ्या संख्‍येने जमाव जमला होता.

  औरंगाबाद - सकल मराठा समाजाच्या विविध ३१ मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कायगाव येथे सोमवारी ठिय्या आंदोलन व दुपारी ३ वाजता गोदावरी नदीच्या पुलावरुन जलसमाधी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार ठरल्याप्रमाणे पहिल्या सत्रा ठिय्या तर दुसऱ्या सत्रात काकासाहेब शिंदे यांनी पुलावरून २५ फुट खाली खोल पाण्यात उडी घेतली. यात त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. यामुळे आंदोलन अधिकच चिघळले.

  पुणे मार्गावरील वाहतुक चार तास ठप्प होती. तर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. क्रांती चौकात शेेकडो आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करून राजीनाम्याची मागणी केली.

  सरकारने खोटे बोलणे बंद करून पहिले मराठा समाजाला आरक्षण लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी सकल मराठा समाजाने ठोक, घोषणा बाजी करून निषेध आंदोलन सुरु केले आहे. त्याला बऱ्याच ठिकाणी हिंसक वळण देखील लागले आहे. मराठ्यांच्या तीव्र विरोधामुळे मुख्यमंत्र्यांना आषाढी वारी देखील करता आली नाही. मंत्री गिरीष महाजन, सुभाष देशमुख यांना घेरावा घालून कोंडी करण्यात आली. पहिले मागणी मान्य करा नंतर चर्चा करा, असा पावित्रा मराठा बांधवांनी घेतला आहे. त्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यात मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांच्या भावना लक्षात न घेता वारकऱ्यांना वेठीस धरणारे शिवरायांचे मावळे असूच शिकत नाही असे विधान केल्याने आंदोलनकाऱ्यांचा संताप आणखी अनावर झाला आहे. त्यात २३ जुलै रोजी कायगाव पुलावरून काकासाहेब शिंदे या २८ वर्षीय तरुणाने गोदावरी नदीत उडी मारली. सुरक्षेच्या कोणत्याच उपाययोजना केलेल्या नव्हत्या. बचाव कार्य उशिराने झाले. त्यामुळे बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने आंदोलन अधिक चिघळले आहे. त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. शहरात दुपारपासून ते रात्री उशिरापर्यंत तणावपूर्ण वातावरण होते. पुंडलीकनगर, हनुमाननगर, जयभवानीनगर, शिवाजीनगर काही वेळेसाठी बंद पाळण्यात आला. तरुण, महिलांनी बोंबा मारो आंदोलन करून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

  आषाढीमुळे अनुचित प्रकार टळला
  काकासाहेब शिंदे या तरुणाचा मृत्यू झाल्याचे कळताच शहर व परिसरातील मराठा बांधवांनी क्रांती चौकात धाव घेतली. तर काहींनी आप आपल्या वॉर्डात, मुख्य कॉलनीत बंद पुकारला. क्रांती चौकात जमा झालेल्या तरुणांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे घोषणाबाजी करून आपला राग व्यक्त केला. रस्ता वाहतुक बंद करण्याचा देखील काहींनी प्रयत्न केला. मात्र, वरिष्ठ समन्वयकांनी त्यांना आषाढी एकदाशीची आठवण करून देत शांततेत आंदोलन करण्यास भाग पडल्यामुळे पुढील अनुचित प्रकार टळला.


  पाच तास पुणे मार्गावरील वाहतुक, बससेवा ठप्प
  कायगाव येथील गोदावरी नदीवरून काकासाहेब शिंदे यांनी उडी घेतल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्यानंतर आंदोलन अधिक चिघळले व पुणे मार्ग पूर्ण बंद पडला. जनसागर संतपाच्या लाटेत रस्त्यावर उतरल्याने वाहतुक सेवा पाच तासांसाठी पूर्ण ठप्प होती. त्यात औरंगाबाद आगारातील १५ बससह विविध आगारातील एकूण दीडशे पेक्षा अधिक बस आडकल्याची माहिती महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिली. पाच तास प्रवाशांना एकाच ठिकाणी थांबावे लागले. त्यांच्या कामाचे नियोजन हुकले. त्यांनाही मनस्ताप सहन करावा लागला.

  पुढील स्‍लाइडवर पाह, क्रांती चौकातील आंदोलनादरम्‍यानची फोटो...

 • tense situation in aurangabad after youth committed suicide for maratha reservation
 • tense situation in aurangabad after youth committed suicide for maratha reservation

Trending