आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शेतकरी संघर्ष कृती समितीतर्फे आंदोलन; सर्वपक्षीय पाठिंबा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर- तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शेतकरी संघर्ष कृती समितीतर्फे गंगापूर तहसीलसमोर १३ डिसेंबरपासून सुरू झालेल्या उपोषण आंदोलनाला दिवसभरात तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाठिंबा जाहीर केला आहे.


तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २७०० रुपये प्रतिटन भाव जाहीर करून २५०० रुपये पहिली उचल पंधरा दिवसांच्या आत देण्यात यावी, बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून हेक्टरी एक लाखाची नुकसान भरपाई देऊन बोगस बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, कृषिपंपांचे वीज कनेक्शन तोडू नये, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना ४८ तासांत शासकीय मदत देण्यात यावी, शेतमजुरी व शेतातील सर्वच कामे रोहयोअंतर्गत करण्यात यावीत, अंबेलोहळ, सावखेडा, गाजगाव येथील जिल्हा परिषदांच्या शाळा बंद करू नयेत, पंचायत समिती रोहयोअंतर्गत मंजूर विहिरी, गोठे यांचे कामे तत्काळ सुरू करण्यात यावे आदी मागण्यांसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.  यामध्ये शेतकरी संघर्ष कृती समितीचे सदस्य तथा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश शेळके, विठ्ठल कुंजर, शेतकरी कामगार पक्ष विधानसभा अध्यक्ष महेश गुजर पाटील, प्रहारचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शेळके, शिवबा संघटनेचे देविदास पाठे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संपत रोडगे सहभागी झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...