आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पैठण- भक्ती भावाचा मेळा झाला तीन सांजा एकनाथा, दर्शन तुझं झाले आता, जातो माघारी नाथा, या संत वचनाप्रमाणे आज लाखो वारकऱ्यांनी पैठण नगरीचा जड अंतकरणाने काल्याचा प्रसाद घेऊन निरोप घेतला. तीन दिवसांपासून पैठणमध्ये फडात एकनाथ भानुदासचा गजर करत पाच लाख भाविक वारकरी तीन दिवस मुक्कामी होते. आज आपापल्या फडात काल्याच्या दहीहंडी फोडून जड अंतकरणाने वारकरी परतीच्या मार्गी लागले.
नाथ वंशज रावसाहेब महाजन गोसावी यांच्या हस्ते नाथ समाधी मंदिरातील काल्याची दहीहंडी फोडून या सोहळ्याची सांगता झाली. या वेळी नाथ वंशज योगिराज महाजन गोसावी, पुष्कर महाजन गोसावीसह रघुनाथ बुवा पांडव, आमदार, नगराध्यक्ष सूरज लोळगे,माजी आमदार संजय वाघचौरे, माजी मंत्री अनिल पटेल, भाजपचे तुषार शिसोदे, डॉ.सुनील शिंदे, माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, पंडित किल्लारीकर, विलास भुमरे, रेखाताई कुलकर्णी, प्रकाश वानोळे, माजी नगराध्यक्ष जितसिंग करकोटक, रवींद्र शिसोदे, अनिल घोडके, आबा बरकसे, संतोष गव्हाणे, सुनील चितळे, शेखर शिंदे, तहसीलदार महेश सावंत, उप विभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल राठोड, चंदन इमले,गट विकास अधिकारी भास्कर कुलकर्णी, सतीश आखेगावकर,अनिल हजारे, शहादेव लोहारे, नामदेव खरात, दिनेश पारीक, गणेश पवार आदींसह नपचे रुषिकेश भालेराव, हरिदास वाघची प्रमुख उपस्थिती होती. शिवाय दुपारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाथांचे दर्शन घेतले. दरम्यान नाथ मंदिरात एक हजारच्यावर भाविक वारकरी भक्त यांनी हरी नामाच्या गजरात तल्लीन होऊन काल्याच्या दहीहंडीला लटकवण्यात आलेला लाडू घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. तर चार ते पाच हजार भक्त भाविक यांनी मंदिराबाहेर लावण्यात आलेल्या स्क्रीनवर हा सोहळा अनुभवला.
पुढाऱ्यांचाच काला
नाथ समाधी मंदिरातील दहीहंडीचा मुख्य सोहळा सामान्य वारकऱ्याच्या नशीब नाही अशी म्हणण्याची वेळ सामान्य वारकऱ्यांवर आली होती. ठराविक पास धारकांनाच काल्याच्या दिवशी मंदिरात प्रवेश दिला जातो.
सर्वच फड रिकामे
तीन दिवसांच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी नाथ नगरीत आले होते. हे वारकरी आपल्या दिंडीच्या फडात सकाळी काल्याची दहीहंडी फोडून त्याचा प्रसाद घेऊन परतीवर निघाले. दुपारनंतर जवळपास सर्वच दिंड्याचे फड रिकामे झाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.