आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामस्थांचा नकार, अखेर पोलिस बंदोबस्तात महिलेवर अंत्यसंस्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण- पैठण शहरालगतच्या पाटेगाव येथील आदिवासी भिल्ल समाजाच्या महिलेचा अंत्यविधी करण्याच्या जागेवर आमचा ताबा असून येथे अंत्यविधी करता येणार नाही, असे ग्रामस्थांनी सांगताच संतप्त नातेवाइकांनी महिलेचा मृतदेह तहसील कार्यालयाच्या दारात आणून ठेवत तासभर ठिय्या दिला. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रथम रात्री महिलेचा मृत्यू झाल्यावर नातेवाईक पाटेगाव गावठाण जागा गट क्र. १६८ येथे खड्डे खोदण्यास गेले असता त्यांना ग्रामस्थांनी ही जागा आमच्या मालकीची असून येथे अंत्यसंस्कार करता येणार नसल्याचे सांगितले. तेव्हा नातेवाईक परतले व पुन्हा सकाळी येथे येताच ग्रामस्थांनी विरोध करत जागा आमची आहे, असे सांगत येथे अंत्यविधी करण्यास नकार दिला होता.   


मीराबाई सुखदेव बरडे (५५) असे मृत महिलेचे नाव असून तिचे अल्पशा आजाराने रविवार दि. ७ रोजी सायंकाळी निधन झाले. महिलेवर रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र येथे भिल्ल समाजासाठी वेगळी स्मशानभूमी नसून पाटेगाव येथीलच गावठाण जागा गट क्र. १६८ वर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. परंतु ही जागा नावे असलेल्या लोकांनी याला विरोध केला. तीन चार वेळा मृतदेह  पुरण्यासाठी खड्डे खोदण्यासाठी लोक गेले. मात्र हा विरोध वाढला. हा विषय तहसीलदार महेश सावंत यांनाही कळविण्यात आले. मात्र याकडे तहसीलदार व मंडळ अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या भिल्ल समाजातील नागरिकांनी थेट पाटेगाव या ठिकाणाहून पैठण तहसील कार्यालयापर्यंत प्रेत खांद्यावर आणत कार्यालयाच्या बाहेर ठेवत अंत्यसंस्कार करण्यासाठी खड्डा खोदण्यास सुरू केली. या वेळी तहसीलवर नागरिकांनी आमच्या आदिवासींकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. दुपारी साडेतीनपासून अर्धा  तासभर मृतदेह  तहसील कार्यालयात ठेवण्यात आला. त्यानंतर तहसीलदारांनी नागरिकांना शांततेचे आवाहन करत मृतदेह पोलिस बंदोबस्तात पुन्हा त्याच ठिकाणी नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.


प्रस्ताव द्या, मार्गी लावू
यापूर्वी या गट क्र. १६८  मध्ये अंत्यसंस्कार होत होते. मात्र ही जागा स्मशानभूमीची नसल्याचे दिसते.  ही जागा संबंधित व्यक्तीच्या नावे असल्याचे कागदपत्रातून तरी दिसते. असे असताना नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी यांना तेथे पाठवले होते. त्यावर येथे कोणी विरोध केला नाही. भिल्ल समाजाने  प्रस्ताव द्यावा तो मार्गी लावू. 
-महेश सावंत, तहसीलदार

बातम्या आणखी आहेत...