आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापुरात ग्रामस्थांची आठ संशयित चोरट्यांना बेदम मारहाण, दोघांचा मृत्यू तर दोघांची प्रकृती गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापुर- गेल्या महिन्याभरापासून ग्रामीण भागात चोर आल्याच्या अफवेने ञस्त झालेल्या लाख पानव व चांडगाव येथील ग्रामस्थानी गुरुवारी राञी अंधारात संशयितरित्या फिरणाऱ्या आठ जणांना दरोडेखोर समजून बेदम मारहाण केली.या मारहाणीत गंभीररित्या जखमी झालेल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.भारत सोनवणे वय ३० रा.मिटमिटा औरंगाबाद, शिवाजी शिंदे वय ४५ रा.राजनगर औरंगाबाद असे ग्रामस्थानी केलेल्या मारहाणीत मृतांची नावे आहेत.

 

मारहाणीत जखमींची नावे : दगू काळे (राजापूर, बीड) ,राजेश मुन्ना भोसले (वय 25 रा.बीड) ,गंगाराम रामदास भोसले (वय 22), गणेश सोनवणे (वय 26 रा.शिऊर ता.वैजापूर), रमेश भावराव पवार (वय 28, अंतरवडी गेवराई जिल्हा. बीड), गमनीदास व्यंकटी काळे (वय 50 रा मुंकूदवाडी औरंगाबाद) असे जखमीचे नावे आहेत. दरम्यान राञीच्या अंधाराचा फायदा घेऊन आठही जण कोणत्या कारणाने शेतवस्त्याच्या आजूबाजूला फिरत होते याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. जखमी झालेल्या संशयितांची गुन्हेगारी पार्श्वभुमी तपासणीवर प्राथमिक भर दिला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...