आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्लोडजवळ तीन मुले बुडाली, 24 तासांनी सापडले मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड - सिल्लाेडजवळील रजाळवाडी तलावात बुडून मंगळवारी ३ शाळकरी मुलांचा मृत्यू झाला.  मृतांत दाेन चुलत भावांचा समावेश आहे.


शहरातील  स्नेहनगरच्या मागील बाजूस असलेल्या अब्दल शहा नगरमध्ये राहणाऱ्या  कुटुंबातील तीन मित्र तालिबखाँ आसेफखॉँ पठाण (१३), मोहंमदखाँ उमरखाँ पठाण (१२) व सोफियान युसूफ पठाण (१२)  मंगळवारी दुपारी घराबाहेर पडले. संध्याकाळ झाली तरी ते परतले नाहीत म्हणून त्यांच्या पालकांनी  शोधाशोध सुरू केली. सिल्लोड शहर, इतर नातेवाईक, परगावी असलेल्या आप्तेष्टांकडे शोध घेऊनही हे तिघे सापडले नाहीत. शेवटी  मंगळवारी रात्री उशिरा एक वाजण्याच्या सुमारास सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात मुले हरवल्याची तक्रार देण्यात आली. 

 

बुधवारी दुपारी या मुलांचे मृतदेह रजाळवाडीच्या तलावात पाण्यावर तरंगताना दिसले. 

ग्रामस्थांनी ही माहिती तातडीने पोलिसांना कळवली. तालिब व मोहंमद हे सख्खे चुलत भाऊ  सातवीत  तर सोफियान पाचवीत शिकत होता. मोहंमद याचे वडील मुलीकडे जयपूरला गेलेले आहेत. मुलांचे मृतदेह सापडले त्या वेळी सोफियानचे वडील युसूफ पठाण जालना येथे नातेवाइकांकडे मुलाचा शोध घेत होते. मात्र, तेथेही काही माहिती मिळाली नाही. तिथेच रजाळवाडी तलावात मृतदेह सापडल्याची बातमी त्यांना कळली.

बातम्या आणखी आहेत...