आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद महापालिकेत पुन्हा राडा, बजेटच्या प्रती भिरकावल्याने तिघांचे नगरसेवक पद रद्द

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- महापालिका स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांना वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्यास अडथळा आणून घोषणाबाजी करणा-या तीन नगरसेवकाचे सदस्यत्व एका दिवसासाठी रद्द करण्यात आले.

 


तीन दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या निवृत्त आठ सदस्यांच्या जागी नवीन आठ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी शहर विकास आघाडीचे गटनेते तथा मावळते सभापती गजानन बारवाल यांनी त्यांचा कार्य काळ संपल्यानंतरही अन्य सदस्यांची शिफारस करण्याऐवजी पुन्हा स्वतःच्याच नावाची शिफारस केली.  यामुळे शहर विकास आघाडीतील सदस्यांनी रविवारी (ता.29 )सभागृहात विशेष बैठकीमध्ये त्यांना वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्याला विरोध केला. मावळत्या सभापतींनी विकास आघाडीतील सदस्यांचा विश्वासघात केला आहे, त्यामुळे त्यांना पुन्हा अंदाजपत्रक सादर करण्यास परवानगी देऊ नये अशी त्यांनी मागणी केली होती. परंतु महापौरांनी सभापती श्री बारवालांना यांना वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्यास पाचारण केले. यावेळी आघाडीचे नगरसेवक कैलास गायकवाड, गोकुळ मलके, राहुल सोनवणे यांनी याला जोरदार विरोध करत घोषणाबाजी सुरू केली. महापौर पक्षपात करत असल्याचा आरोप करून बजेटच्या प्रती सभापती व महापौरांच्या अंगावर फेकल्या. त्यामुळे महापौरांनी त्यांना एक दिवसासाठी निलंबित केले. 

बातम्या आणखी आहेत...