आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो उलटला, तीन जणांचा गुदमरुन मृत्यू, दोघे जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा- लातूर येथून कर्नाटकातील रायचूर येथे सागवानी लाकडाच्या फळ्या घेऊन जाणारा आयशर टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दोघे जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.    

 

आयशर टेम्पो शनिवारी मध्यरात्रीनंतर अडीचच्या सुमारास उमरगा-लातूर मार्गावरील माडज पाटीजवळ आला असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो रोडच्या कडेला खड्ड्यात उलटला. टेम्पोमध्ये सागवानाच्या फळ्या असल्यामुळे मागे बसलेले पाच मजूर अडकून त्यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. दोघे जखमी झाले आहेत. जखमीतील एकाची प्रकृती गंभीर आहे. रात्रीचा अपघात घडल्यामुळे त्यांना वेळीच उपचार मिळाला नाही. लाकडांच्या फळ्यांमध्ये गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. 

 

बातम्या आणखी आहेत...