आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात हजार टन कचरा पडून, आज स्वच्छता मोहीम; हर्सूल-सावंगीत कचरा टाकण्यास झाला होता विरोध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- हर्सूल-सावंगी येथील नियोजित जागेत शनिवारी कचरा टाकण्यास स्थानिकांसह नगरसेवक पूनमचंद बमणे यांनी विरोध केला. त्यामुळे रविवारी शहरातील कचरा उचलण्यात आला नाही. ठिकठिकाणी एक हजार टनपेक्षा जास्त कचरा साचला आहे. सोमवारी सकाळपासून स्वच्छता मोहीम राबवून नियोजित जागेवर कचरा टाकण्यात येईल, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन प्रमुख विक्रम मांडुरके यांनी दिली. 


सर्वाधिक ५०० टन कचरा सेंट्रल नाका येथे साचलेला आहे. त्यावर तेथेच प्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच शहरातील इतर ठिकाणचा कचरा सोमवारी होणाऱ्या स्वच्छता मोहिमेनंतर हर्सूल-सावंगी, पडेगाव आणि चिकलठाण्याच्या नियोजित जागेत टाकला जाईल. साचलेल्या कचऱ्यावर बायोकेमिकल्स फवारले जात आहे. तसेच त्यावर प्रक्रियाही करण्यात येणार आहे. कर्मचारी सलग चार दिवस दोन शिफ्टमध्ये कचरा हटवण्याचे काम करत होते. रविवारी त्यांना आराम मिळाला. 


शिवीगाळ प्रकरणाचा अहवाल तयार 
हर्सूलचे नगरसेवक बमणे यांनी कचरा टाकण्यास विरोध करत अधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली होती. त्याचा अहवाल तयार करण्यात आला असून सोमवारी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्तांना देण्यात येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...