आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावी प्रवेशाची आज पहिली गुणवत्ता यादी; ६ रोजी दुसरी, तर ९ ला तिसरी यादी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज घेतले आहेत. त्याची छाननी करून सोमवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास प्रत्येक महाविद्यालयात यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानुसार त्या-त्या महाविद्यालयात गुणवत्ता यादी पाहता येणार आहे. 


शहरातील नामवंत विद्यालयांच्या विज्ञान शाखेची कटऑफची यादी ८५ ते ९३ टक्केच्या दरम्यान राहील. वाणिज्य शाखेचा कटआॅफ ७५ टक्के राहण्याची शक्यता आहे. कला शाखेला येईल त्याला प्रवेश मिळणार आहे. पहिल्या गुणवत्ता यादीनुसार ४ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत आहे. त्यानंतर ६ जुलैला दुसरी व ९ जुलै रोजी तिसरी यादी लागेल. शहरातील नामवंत महाविद्यालयातील पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीत विज्ञान व वणिज्यच्या जागा भरल्या गेल्यास त्यांना तिसरी यादी लावण्याची गरज भसणार नाही. प्रवेशापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगेच प्राचार्यांची बैठक घेऊन नियोजन केले जाईल, अशी माहिती शिक्षण उपनिरीक्षक मिलिंद मोरे यांनी दिली. 

 

बातम्या आणखी आहेत...