आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठातील पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेचा आजचा दिवस शेवटचा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभाग, संलग्नित महाविद्यालये आणि उस्मनाबाद उपकेंद्राच्या विभागांतील विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मंगळवारी (३ जुलै) अखेरची मुदत आहे. पीजी-सीईटीमधील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशाची २८ जूनपर्यंत अखेरची मुदत होती. 


९ हजार ५३३ जागांपैकी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक जागा रिक्त राहिलेल्या आहेत. त्यामुळे २८ जून रोजी झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी ३ जुलै रोजी स्पॉट अॅडमिशन घेण्याची विद्यार्थ्यांना संधी दिली आहे. वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र आणि विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखांसाठीच फक्त पीजी-सीईटी घेण्यात आली होती. आता सकाळी साडेदहापासून विविध विभाग आणि महाविद्यालयांमध्ये स्पॉट अॅडमिशनसाठी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर आणि पीजी प्रवेश समितीचे समन्वयक डॉ. वाल्मीक सरवदे यांनी केले आहे.