आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज ३८ केंद्रांवर हाेणार नीट परीक्षा, गैरप्रकार टाळण्यासाठी कडक नियम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या वतीने घेण्यात येणारी नॅशनल एलिजबिटी-कम-एंट्रन्स टेस्ट (नीट) रविवार, ६ मे रोजी शहरातील ३८ परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी जवळपास १८ हजार विद्यार्थी बसले आहेत. या परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी कडक नियम करण्यात आले आहेत. या नियमानुसार विद्यार्थ्यांना ७:३० वाजता परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार आहे. 


परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांना कंपास, पिन्स, कॅल्क्युलेटर अशी कोणतीही साधने स्वतःबरोबर आणता येणार नाहीत. याशिवाय गॉगल्स, वॉलेट, पाऊच, हँडबॅग, बेल्ट, रुमाल अशा वस्तू नेण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची संवादाची तसेच इतर इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स अथवा साधने घेऊन विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नसल्याचे सीबीएसईने म्हटले आहे. 


विद्यार्थ्यांना फिक्या रंगाचे आणि अर्ध्या बाह्यांचे शर्ट घालावयाचे असून त्यावर मोठी बटणे किंवा बॅजेस लावता येणार नाहीत. त्याचप्रमाणे बूट न वापरता केवळ चप्पल घालूनच परीक्षेला येण्याचे बंधन घालण्यात आले आहे. जीन्स, शर्ट असे कपडे चालणार असले तरी कुर्ता, पायजम्यावर बंदी घालण्यात आली आहे. विद्यार्थिनींना कोणत्याही प्रकारचे दागिने घालून परीक्षेला बसता येणार नाही. हिजाब तसेच बुरखा घालण्यास परवानगी देण्यात आली असली तरी पारंपरिक पोशाख घालणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेच्या बऱ्याच आधी परीक्षा केंद्रावर पोहोचावे लागणार आहे. अशा विद्यार्थ्यांची केंद्रावर तपासणी केली जाणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...