आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज आॅरिक - बिडकीन औद्योगिक क्षेत्राचा शुभारंभ, मुख्‍यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत २१ एप्रिल रोजी औरंगाबादेत महत्त्वाकांक्षी आॅरिक - बिडकीन औद्योगिक क्षेत्राचा शुभारंभ होत आहे. याशिवाय ५० वर्षे झाल्याचे औचित्य साधून निर्लेप उद्योग समूहाचा कार्यक्रम, पोलिसांच्या तीन अॅपचे उद््घाटन व मराठवाड्याचे लोकनेते स्व. बाळासाहेब पवार यांच्यावर काढलेल्या ‘नीतिधुरंधर’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आदी कार्यक्रमही होणार आहेत.


आॅरिक - बिडकीन औद्योगिक क्षेत्राचा शुभारंभ दुपारी २.३० वाजता  बिडकीन येथे होणार आहे. या वेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री दीपक सावंत, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, खासदार चंद्रकांत खैरे, राजकुमार धूत, रावसाहेब दानवे, उद्योग खात्याचे अपर सचिव सुनील पोरवाल, डीएमआयसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलकेश शर्मा उपस्थित राहतील. यानंतर महावीर जोंधळे लिखित ‘नीतिधुरंधर’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन दुपारी ३ वाजता संत तुकाराम नाट्यगृहात होणार आहे. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी अर्थमंत्री जयंत पाटील, ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांची प्रमुख उपस्थिती राहील.

 

पोलिस अॅपचा शुभारंभ

पोलिस विभागाच्या तीन अॅपचा शुभारंभ दुपारी ४.३० वाजता एमजीएम कॅम्पस येथे होईल. या वेळी हरिभाऊ बागडे, हायकोर्टाचे न्यायमूर्ती रवींद्र बोर्डे, पोलिस महासंचालक सतीशचंद्र माथूर उपस्थित राहतील.

बातम्या आणखी आहेत...