आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वास पाटील यांचे उद्या 'पानिपत'वर व्याख्यान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बुलंद छावा मराठा युवा परिषदेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६१ व्या जयंतीनिमित्त व 'पानिपत' या कादंबरीस ३० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांचे पानिपत या विषयावर रविवारी (२७ मे) सायंकाळी ५.३० वा. 'रुख्मिणी हॉल' एम.जी.एम. कॅम्पसमध्ये व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. 


  /> कार्यक्रमाचे उद््घाटन एम.जी.एम.चे सचिव अंकुशराव कदम, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उद्योजक पद्माकरराव मुळे, प्रमुख पाहुणे म्हणून लोकविकास बँकेचे अध्यक्ष जे. के. जाधव, एम.आय.डी.सी.चे विभागीय अधिकारी सोहम वायाळ, महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहा. संपादक प्रमोद माने आदींची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मार्गदर्शक प्रदेशाध्यक्ष नानासाहेब कुटे, प्रदेश सचिव सुरेश वाकडे, जिल्हा बँकेचे संचालक अभिजीत देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष सतीश वेताळ, समिती अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, स्वागताध्यक्ष संजय बनकर, सरचिटणीस नितीन घुगे, जिल्हाध्यक्ष मनोज गायके, प्रदेश प्रवक्ते नितीन शेळके, मराठवाडा अध्यक्ष साहेबराव मुळे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप जाधव, अशोक काळे, प्रदीप हारदे, जिल्हा कार्याध्यक्ष रामेश्वर राजगुरे, शहर कार्याध्यक्ष योगेश देशमुख, बाबु चौधरी आदींनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...