आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील महात्‍मा फुले हाऊसिंग सोसायटीमध्‍ये वृक्ष लागवड, नागरिकांचा उत्‍सफुर्तपणे सहभाग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहरातील महात्‍मा फुले हाऊसिंग सोसायटी येथे नुकताच वृक्षरोपणाचा कार्यक्रम राबवण्‍यात आला. यावेळी परिसरात 50 झाडे लावण्‍यात आली. नगरसेवक रुपचंद वाघमारे यांच्‍या हस्‍ते वृक्षरोपण करून वृक्ष लागवड करण्‍यात आली. यामध्‍ये परिसरातील नागरिकानीं उत्‍सफुर्तपणे सहभाग घेतला. सध्‍या राज्‍यभरात वृक्षसंवर्धनासाठी मोहिम राबविली जात आहे. झाडे जगली तरच आपल्‍याला दुष्‍काळाचा फेरा टाळता येईल. त्‍यामुळे पाऊस पडावा, पक्ष्‍यांची संख्‍या वाढावी म्‍हणून प्रत्‍येकाने झाडे लावून ती जगवली पाहिजे, असे प्रतिपादन यावेळी नगरसेवकांनी केले. तसेच वृक्षलागवड करण्‍यात आलेल्‍या झाडांची देखभालही केली जाईल, असे उपस्थित महिलांनी सांगितले. 


पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो... 

बातम्या आणखी आहेत...