आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफर्दापूर- उसाची मळी घेऊन जाणारा ओव्हर लोड ट्रक ब्रेक निकामी झाल्याने फर्दापूर पोलिस चौकीत घुसला. पोलिस चौकीच्या ओट्यावर चहा पित बसलेल्या चौघांना चिरडून पोलिस चौकी तुटल्यानंतरच हा ट्रक थांबला. यात एक जण ठार तर तीन गंभीर जखमी झाले. सुदैवाने पोलिस चौकीत कोणीही नव्हते. ही घटना रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास फर्दापूर बसस्थानकानजिक घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तिघांना उपचारासाठी जळगाव. सोयगाव आणि औरंगाबाद येथील रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे
रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास औरंगाबादहून जळगावकडे उसाची मळी घेऊन जाणाऱ्या ओव्हर लोड ट्रकचे (क्र.एम एच २८.बी.७६२५) फर्दापूर बसस्थानकाजवळ ब्रेक निकामी झाले. या ट्रकसमोर एसटी महामंडळाची बस होती. बसला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक पोलिस चौकीच्या बाजूला असलेले चपला बुटांचे दुकान तोडून ट्रक पोलिस चौकीत घुसला. या वेळी चौकीच्या बाजूला असलेल्या चहा टपरीतून चहा घेऊन तो पोलिस चौकीच्या ओट्यावर पित बसलेल्या चार जणांना ट्रकने चिरडले. यात युसूफखा रशीदखा पठाण (६५) रा फर्दापूर हे जागीच ठार झाले तर असदखा उस्मानखा (७०) व रामचंद्र मंगरूळे (७०) व चपलच्या दुकानाचे मालक प्रेमचंद भागचंद कोटी (६१,सर्व रा. फर्दापूर) हे गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारांसाठी जळगाव, सोयगाव, औरंगाबाद येथील रुग्णालयांत हलवण्यात आले. ट्रक थांबताच ट्रक चालकाने ट्रकमधून उडी मारून पलायन केले.
रुग्णवाहिका नेहमीप्रमाणे लेट
फर्दापूर येथे १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका देण्यात आली आहे. परंतु ही रुग्णवाहिका अपघात झाला किंवा रुग्णाला बाहेरगावी हलवण्यासाठी फोन केला तरी वेळेवर येत नाही. रविवारीही नागरिकांनी रुग्णवाहिकेसाठी फोन केला. परंतु रुग्णवाहिका तासभर उशिरा आली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी चालकाला चांगला चोप दिला. डॉक्टरलाही धक्काबुक्की केली. पोलिसांनी मध्यस्थी करून नागरिकांच्या तावडीतून सोडवले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.