आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्‍लोड येथे ट्रक - दुचाकीचा अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू, एक गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड - भरधाव जाणाऱ्या ट्रक व दुचाकीची जोराची धडक होऊन दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी  झाला. या बाबत गुन्हा दाखल झाला आहे.   


शनिवार (दि.९) रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सिल्लोड शहराबाहेरील वळण रस्त्यावरील शिक्षक कॉलनीजवळ ही घटना घडली. माहितीनुसार, रोहित अशोकराव बचाटे (२३), शुभम माणिकराव बचाटे (२८, दोघे रा. जयभवानीनगर, सिल्लोड) हे दुचाकीने (एमएच २० ई एच ६३६६)  आझाद चौकाकडून आंबेडकर चौकाकडे येत होते. शहराबाहेरील वळण रस्त्याने जाताना शिक्षक कॉलनीजवळ जळगावकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या ट्रकशी  (आरजे १९ जीए २३१३) दुचाकीची धडक झाल्याने दुचाकीवरील रोहित बचाटेचा जागेवरच मृत्यू झाला, तर शुभम बचाटे हा गंभीर जखमी झाल्यामुळे त्यास सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले असता प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी घाटीत पाठवण्यात आले.  

बातम्या आणखी आहेत...