आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटी हॉस्पिटलमधून दोन कैदी पळाले, एकाला पकडले; हवालदाराला मारहाण करून खोलीत कोंडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- घाटीतील कैद्यांच्या वाॅर्डामध्ये उपचार घेत असणाऱ्या दोन कैद्यांनी सोमवारी सकाळी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यात एक जण यशस्वी झाला तर दुसऱ्याला याच भागातील रुग्णवाहीकेच्या चालकांनी पकडून दिले. पळून गेलेल्या कैद्यावर  रेल्वे पोलिसांकडून आता पर्यंत दोन खूनाचे गुन्हे दाखल असून सध्या तो चोरीच्या प्रकरणात एका वर्षाची शिक्षा भोगत होता.

 

सोनू दिलीप वाघमारे (२० रा. राजू नगर) असे पळून गेलेल्या कैद्याचे नाव आहे. तर अक्षय श्याम आठवले (२३ रा. माळवेस बीड) असे पकडून दिलेल्या कैद्याचे नाव आहे. या दोघांच्या विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात पळून जाणे आणि हवालदारास जीवे मारण्याचा प्रयत्न करणे या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात येणार  आहे.

 

सोमवारी सकाळी पावने सातच्या सुमारास सोनू आणि  अक्षय याने औषधाची गोळी घेण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या हवालदार योगेश जोशी (५३) यांना पिण्यासाठी पाणी मागितले. त्यांनी प्रथम पाणी खिडकीतून देण्याचा प्रयत्न केला. मात्र बाटली खिडकीतून गेली नाही. म्हणून त्यांनी दरवाजा उघडला आणि  बाटली देण्यासाठी हात आतमध्ये नेला. तोच अक्षयने त्यांना आत खेचले आणि आणि त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी वार्डात फक्त एक वृद्ध केदी होता. ही झटापट सुरु असतांनाचा सोनू यांनी जोशी यांचा मागून गळा आवळला त्यामुळे हावालदाराची पकड ढिली झाली.  त्यानंतर या दोघांनी जोशींना आत कोंडून बाहेरुन कडी लावून पळ काढला. या परिस्थितीत देखील जोशींनी आरडा ओरड केली. त्यामुळे इतर वैद्यकीय कर्मचारी गोळा झाले त्यांनी देखील आरडा ओरड करत त्यांच्या पाठीमागे पळाले. ही बाब जवळच उभे असलेले रुग्णवाहीकेचे चालक विनोद करे, आकाश हिवराळे आणि शेख अलीम यांनी कळाली. त्यांनी दुचाकी घेत त्यांचा पाठलाग करण्यात सुरुवात केली. मात्र सोनूने त्यांना चकवा देत पळ काढला. तर अक्षयला धाप लागली आणि तो घाटीच्या क्वाॅटर्स पर्यंतच पळू शकला.  विनोद आणि अलीम यांनी त्याच्यावर झडप टाकत त्याल पकडले. त्यांच्या दुचाकीवर त्याला बसवून पुन्हा घाटीतल कैद्यांच्या वार्डात आणून पोलिसांच्या हवाली केले. घटनेची माहीती मिळताच सहाय्यक पोलिस आयुक्त ज्ञानोबा मुंढे, निरीक्षक राजेंद्र कत्तुल, जयश्री आढे, गुन्हे शाखेखे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.


केवळ दोन कर्मचाऱ्यांच्या भरवशावर होती सुरक्षा
घाटीतील कैद्यांच्या वार्डाची सुरक्षा केवळ दोन कर्मचाऱ्यांच्या भरवशावर आहे. ज्यावेळी ही घटना घडली जेव्हा योगेश जोशी आणि बबन जाधव हे दोघे कर्तव्यावर होते. मात्र जाधव कुठल्यातरी कामासाठी बाहेर गेले त्यामुळे जोशी एकटेच होते. ५३ वर्षाचे जोशी प्रकृतीने देखील जरा बारीक आहेत. त्याचाच फायदा घेत अक्षय आणि सोनू यांनी हा कट रचला होता. सोनू हा ३० मार्च पासून उपचारासाठी घाटीत आला आहे तर अक्षयला १९ एप्रिल रोजी उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले आहे. त्याच्या छातीत बंदुकीचे छरे आडकले असून त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होते म्हणून दाखल करण्यात आले होते. तर सोनूच्या मणक्याला त्रास होत होता असे त्यांनी सांगितले होते.

 

चार दिवसात रचला कट
अक्षय आणि सोनू यांनी मागील चार दिवसात हा सगळा कट रचला, या वार्डाच्या बाहेर कुठलीही सुरक्षा नाही. तारेचे कंपाऊड आहे ते देखील तुटलेले आहे. ते दुरुस्त करावे सुरक्षा रक्षक मिळावे यासाठी येथील कर्मचाऱ्यांनी पत्रव्यहार देखील केला आहे. सोमवारी सकाळी झालेला प्रकार सर्व प्रकार हा सीसीटीव्ही कैद झाला आहे. त्याची तपासणी झाल्यानंतर नेमका प्रकार कसा घडला हे समजू शकेल. पोलिसांनी त्यासाठी घाटीशी पत्रव्यवहार केला आहे.  विनोद, अलीम या दोन चालकांनी धाडस करीत पळून जाणाऱ्या अक्षयला पकडले त्यांचे पोलिसांनी कौतूक केले.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा...कैदी पळतानाचा सीसीटीव्ही फुटेच...

बातम्या आणखी आहेत...