आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोडखा येथे क्षुल्लक कारणावरून दोन गटांत हाणामारी, 17 जणांवर गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खुलताबाद - तालुक्यातील बोडखा येथे शेतात लाल माती टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाली.  या प्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका गटातील शेख मुस्तफा यांनी दिलेल्या तक्रारीवरून कय्युम पटेल, अय्युब पटेल, सलीम पटेल, याकूब पटेल, अकबर पटेल, अरबाज पटेल, अलिम पटेल   व अन्य दोन महिलांसह अशा ९ लोकांवर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

 

तर  दुसऱ्या गटातील अलिम पटेल यांनी दिलेल्या तक्रारीवरून मज्जू पटेल, बबलू पटेल, बिलाल पटेल, इम्रान पटेल, अहेमद पटेल, मुस्तफा पटेल व दोन महिलांसह ८ लोकांवर गुन्हा दाखल झाला. दोन्ही गटांच्या परस्पर तक्रारीवरून १७ लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...