आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोन अपघातात दोन जण ठार, एक गंभीर; ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लासूर स्टेशन - ट्रक अपघातात मोटारसायकल चालक जागीच ठार झाल्याची घटना नागपूर-मुंबई महामार्गावरील आरापूर शिवारातील साई कृष्णा हॉटेलसमोर रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. नारायण मनोहर लंबे (रा. भोकरगाव ता. वैजापूर) असे मृताचे नाव आहे. 

 

वैजापूरहून औरंगाबादकडे जाणाऱ्या भरधाव ट्रक (क्र. सीजे ०७ आर.यू ९२२२)ने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला (जीजे ०५ सीसी २७३९) धडक दिली. यात नारायण लंबे मृत झाले असून त्यांचे भाऊ राजाराम मनोहर लंबे हे गंभीर जखमी झाले. दरम्यान अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संदीप काळे यांनी घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी शिल्लेगाव पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 


 महामार्ग बनला मृत्यूचा सापळा, सर्वत्र खड्डेच खड्डे
या नागपूर-मुंबई महामार्ग खड्यात गेल्याने मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत. अनेकांना या महामार्गावर अपघातात आपला जीव गमवावा लागल्याचे संभाजी सेनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पा.तायडे यांनी सांगितले.  शुक्रवारी झालेल्या बोलेरो आणि इंडिगो कारच्या  अपघातात एक ठार झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी आरापूर शिवारात आणि वसूसायगावजवळील अशा दोन अपघातात मोटारसायकलस्वार दोघांचा मृत्यू झाला.  वसूसायगावजवळ रविवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास भरधाव आयशर टेम्पो (एमएच २३ डब्ल्यू ९९७) ने औरंगाबादहून लासुरस्टेशनला येणारी मोटारसायकलला (एमएच २३ एक्यू ५२७५ ) पाठीमागून धडक दिली. यात संदीप नारायण राठोड (२९, रा. राणेगाव ता. शेवगाव जि. नगर ) हा जागीच ठार झाला.

बातम्या आणखी आहेत...