आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळला, मलब्याखाली दबून दोघांचा मृत्यू, सात जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काम सुरू असताना कमानीचा स्लॅब कोसळला, जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. छाया : संदीप मोरे - Divya Marathi
काम सुरू असताना कमानीचा स्लॅब कोसळला, जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. छाया : संदीप मोरे

औरंगाबाद- फुलंब्री तालुक्यातील निधोना येथे बांधकाम सुरू असलेली स्वागत कमान कोसळून २ मजूर त्याखाली दबून ठार झाले, तर ७ मजूर गंभीर झाल्याची घटना मंगळवारी (१० एप्रिल) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेची वडोदबाजार पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 


सोनू आलाने (१८,रा. परभणी), बालाजी रामभाऊ भिसे (२७, रा.पिंप्री, ता.गंगाखेड, जिल्हा परभणी) ही या अपघातात कमानीखाली दबून ठार झालेल्यांची नावे आहेत. तर सुनील उत्तम मोकाशे (२२, रा.पिशोर), तिरुपती सुरेश लवाटे (४५, रा.पिशोर), सागर शंकर आहेर (२०, रा.पिशोर), रामचंद्र विष्णू खोकालकर (३५,रा.पिशोर), मनोज सखाराम धने (३०, रा. पिशोर), गणेश काटकर (२२, रा.आनंदवाडी ता.गंगाखेड जि. परभणी), भागवत रामभाऊ भिसे (३५, रा. पिंप्री ता.गंगाखेड जि. परभणी) असे कमान पडून जखमी झालेल्यांचे नावे आहेत. 


तालुक्यातील निधोना येथे मागील तीन महिन्यांपासून ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने स्वागत कमानीचे काम सुरू होते. लोकवर्गणीतून सुमारे साडेचार लाख रुपयांचा स्वागत कमान बांधण्याचा ठेका भागवत रामभाऊ भिसे यांना देण्यात आला आहे. कमानीचे काम सुरू झाल्यापासून येथे (पिशोर, ता.कन्नड) व परभणी जिल्यातील गंगाखेड येथील १५-२० मजूर रोज काम करत होते. या कमानीच्या बाजूच्या दोन कॉलमचे काम पूर्ण होऊन आज मंगळवार, दि.१० रोजी कमानीवरील भरण्याचे काम सुरू होते. दरम्यान, सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास स्लॅबला देण्यात आलेल्या लाकडी बल्ल्या अचानक तुटल्याने स्लॅब अचानक कोसळून त्याखाली दबून दोघे जागीच ठार झाले. उर्वरित ७ जणांना गावकऱ्यांनी जेसीबीच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. यामध्ये ७ पैकी ४ जण गंभीर झाले आहेत. 


जखमी व मृतांना फुलंब्री येथील महात्मा फुले क्रीडा रुग्णवाहिका चालक विजय देवमाळी व त्यांचे सहकारी इरफान पठाण, अनिल सावळे यांनी तीन रुग्णवाहिकाद्वारे फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉ. संजय डखणे व डॉ.अजिंक्य परे यांनी जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात (घाटी) येथे पाठवण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...