आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुले पळवण्याच्या संशयावरुन दोन महिलांसह चौघांना बेदम मारहाण, पोलिसांचे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- मंठा शहरात मुले पळणा-या टोळीच्या संशयावरुन दोन महिलांसह दोन पुरुषांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. चौघांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दोन्ही महिला बसस्थानकात बुरखा घालून भीक मागत होत्या. तर दोन आंबेडकर चौकात दोन पुरुष उभे होते. लोकांना त्यांचा संशय आल्याने मारहाण केली. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता सोशल मीडियात पसरलेल्या अफवेमुळे त्यांना मारहाण झाल्याचे समोर आले आहे. 

 

आज ईदचा सण असल्याने शहरात सकाळपासून लोकांची गर्दी होती. शहरात सर्वत्र उत्साही वातावरण होते. उत्साही वातावरणात बसस्थानकात मुले पळविणारी टोळी आल्याच्या अफवेने गर्दी झाली. या गर्दीत दोन बुरखा घातलेल्या महिलांना जमावाने मारहाण केली. याची माहिती काही लोकांनी  पोलिसांनी दोघींना पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतरर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जमावाने दोघांना मारहाण करीत पोलिस ठाण्यात आणले. 

 

मिळालेल्या माहितीनुसार कविता राजू चव्हाण (रा. चारठाणा, ता. जिंतूर जि.परभणी)  व यमा भगवान पवार (रा. कुर्हाणपूर, ता. लोणार, जि. बुलढाणा) या महिला असून दोघी ईद निमित्त जास्त पैसे मिळतील म्हणून बुरखा घालून भिक मागत होत्या. तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ दुपारी दीड ते दोन वाजे दरम्यान येथील सचिन रामभाऊ पाटोळे  (वय 20, वाटूर ता. परतूर जि. जालना ) व संभाजी संजय पाखरे (वय 16 वर्षे) हा दहावीत शिकणारा विद्यार्थी ईद निमित्त शिरखुर्म्याची भिक मागत फिरत होते.  लोकांना त्यांचा संशय आला आणि मुले पळविणारे म्हणून त्यांना बेदम मारहाण केली. यानंतर त्या दोघांनाही पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांची चारही जणांची चौकशी सुरु केली आहे.

 

पोलिसांचे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
या घटनेनंतर मंठा येथील पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी असे आवाहन केले आहे की , नागरिकांनी फेसबुक किंवा व्हाटस्अप वरील कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवु नये, तसेच संपूर्ण माहिती असल्याशिवाय पोस्ट फाँरवर्ड करु नये. संशयित आढळून आल्यास पोलिसांना खबर द्यावी किंवा त्यांना पोलीसांच्या स्वाधीन करावे. त्यांना मारहाण करून कायदा हातात घेऊ नये. शहरातील शांतता कायम राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. मंठा. बदनापूर, आणि अंबड या तीन तालुक्यात सर्वाधिक अफवा आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...