आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्लीहून बीडमध्ये आले होते दोन शिक्षक, या एका चुकीमुळे झाला दोघांचाही मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- परळी तालुक्यातील सिरसाळा गावात कालव्यात पोहण्यासाठी उतरलेल्या दोन शिक्षकांचा बुडून मृत्यू झाला आहे. दोन्ही शिक्षक हे दिल्ली येथील असून ते  इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकवत होते. भानु प्रकाश (22) आणि शुभमकुमार सिन्हा (23) अशी शिक्षकांची नावे आहेत दोघेही मुळचे दिल्ली येथील रहिवासी आहे. 

 

भानुप्रकाश हे सिरसाळातील देवगिरी ग्लोबल अॅकॅडमी या इंग्रजी शाळेत तर शुभम माजलगाव तालुक्यातील लोणगावातील सरस्वती पब्लिक स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी करत होते. दोघे माजलगावमध्ये खाजगी क्लासेस देखील घेत होते. बुधवारी सायंकाळा माजलगाववरुन परतताना  ते गोवर्धन हिवरा येथे कालव्यात पोहण्यासाठी उतरले पण पाण्याचा वेग जास्त असल्याने आणि दोघांनाही पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडाले गुरुवारी सकाळी त्यांचे मृतदेह सबराबाद शिवारातील एका पुलाला अडकलेले आढळले.  या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या दुर्घटनेची माहिती दोघांच्या कुटूंबियांना दिली आहे. 

बातम्या आणखी आहेत...