आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'अर्जुना\'च्या हाती बाण येताच \'दानवा\'चा वध करू- अर्जून खोतकरांची दानवेंविरोधात फटकेबाजी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'अर्जुनाच्या हाती बाण आली की दानवाचा वध होईल' अशा शब्दांत खोतकर यांनी दानवे यांना लोकसभेसाठी उघड आव्हान दिले आहे. - Divya Marathi
'अर्जुनाच्या हाती बाण आली की दानवाचा वध होईल' अशा शब्दांत खोतकर यांनी दानवे यांना लोकसभेसाठी उघड आव्हान दिले आहे.

 जालना- जालन्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष व खासदार रावसाहेब दानवे यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीत दंड थोपटण्यास मी तयार आहे, अशी गर्जना शिवसेनेचे नेते व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली आहे. 'अर्जुनाच्या हाती बाण आली की दानवाचा वध होईल' अशा शब्दांत खोतकर यांनी दानवे यांना लोकसभेसाठी उघड आव्हान दिले आहे. तसेच जालन्यातून शिवसेनेचा लोकसभेचा उमेदवार खोतकर असणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे मानण्यात येत आहे. 

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. मराठवाड्यातील 8 तर नगर- सोलापूरमधील 4 अशा एकून 10 जिल्ह्यातील 12 लोकसभा मतदारसंघातील तयारीची माहिती घेण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसाच्या औरंगाबाद दौ-यावर पोहचले आहेत. गुरवारी सकाळीच ते औरंगाबाद शहरात विमानाने दाखल झाले. यानंतर आज दिवसभर ते मराठवाड्यातील 8 लोकसभा मतदारसंघातील तयारीचा आढावा घेत आहेत. यावेळी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि लोकसभा निवडणुकीसाठीचे मराठवाडा, अहमदनगर आणि सोलापूरचे निरीक्षक रामदास कदम उपस्थित आहेत.

 

आज दुपारी उद्धव ठाकरे यांनी जालना येथे भेट दिली व तेथे शिवसेना पदाधिका-यांची बैठक घेतली. जालना लोकसभा मतदारसंघावर उद्धव ठाकरेंनी विशेष भर दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व खासदार रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदारसंघातून सलग 4 वेळा निवडून गेले आहेत. मात्र, आता शिवसेनेने त्यांच्याविरोधात दंड थोपाटले आहेत. जालना लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून मंत्री अर्जुन खोतकर यांचे नाव आघाडीवर आहे. 

 

याबाबत पत्रकारांशी बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले, जालना लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद आहे. 2014 साली लोकसभा निवडणुकीत भाजपला शिवसेनेची साथ असल्याने दानवे विजयी झाले. मात्र येथील मतदार शिवसेनेच्या विचारधारेला मानणारा आहे. त्यामुळेच जालन्यातून शिवसेनाच लोकसभा लढवणार आणि जिंकणार. गेली 30 वर्षे मी येथून निवडणुक लढवत आहे. सहा वेळा जालन्यातून विधानसभा निवडणूक लढविली आहे. आता लोकसभेला हाती शिवसेनेचा बाण असेल तर दानवाचा वध होणारच असे अर्जुन खोतकर यांनी खासदार दानवे यांचे नाव न घेता टोला लगावला. 

 

सोलापूर, माढा, शिर्डी व अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा उद्या आढावा घेणार-

 

उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद दौ-यात मराठवाड्यातील 8 व सोलापूर व नगर येथील प्रत्येकी दोन अशा 12 लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक रामदास कदम सोबत आहेत. आज मराठवाड्यातील 8 मतदारसंघातील तयारीचा आढावा उद्धव ठाकरे यांनी घेतला. शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा या दोन लोकसभा मतदारसंघातील तर अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी व अहमदनगर या दोन लोकसभा मतदारसंघातील तयारीचा आढावा उद्धव ठाकरे रामदास कदम व शिवसेनेच्या पदाधिका-यांकडून घेतील.  

बातम्या आणखी आहेत...