आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूर :स्वस्तात सोने देण्याच्या बहाणा, दरोडेखोरांच्या टोळीतील जेरबंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर - स्वस्तात सोने देण्याच्या बहाणा करून बोलवलेल्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकण्यासाठी लपून बसलेल्या दरोडेखोरांच्या टोळीतील २ जणांना पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले. ही  घटना शनिवारी शहरालगतच्या शेळके वस्तीजवळ घडली. टोळीतील तिघे जण मात्र पसार झाले असून यात एका महिलेचाही समावेश आहे. शुभम शाहिरी काळे (२०, रा.कोपरगाव) व बाळू देसाई काळे (३५, रा. आडगाव निपाणी ता.जि.औरंगाबाद) अशी पकडलेल्यांची नावे आहेत. तर या टोळीतील प्रवीण शाहिरी चव्हाण, अन्याबाई शाहिरी चव्हाण दोघे रा.कोपरगाव व अन्य एक हे तिघे फरार झाले आहेत.


 टोळीने एका व्यापाऱ्याला स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने शहरालगतच्या शेळकेवस्ती परिसरात बोलावले होते. या ठिकाणी येणाऱ्या व्यापाऱ्याला मारहाण करून त्याच्याकडील रोकड पळवून नेण्याचा डाव आखल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांच्या विशेष पथकाचे विलास हजारे यांना खबऱ्याने दिली.


त्या माहितीवरून हजारे यांनी सहायक पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्याशी संपर्क साधत या टोळीला पकडण्याचे नियोजन आखले. त्यानुसार शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास विशेष पथकातील विलास हजारे, कुकलारे, लोखंडे, राठोड, वसावे व जाधव कर्मचारी हे शासकीय वाहनातून तर सहायक पोलिस निरीक्षक रामहरी जाधव, बाबासाहेब डांगे आदी खासगी वाहनाने या ठिकाणी जावून धडकले. खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून शेत गट क्र.३६२ मध्ये झुडपात दरोडेखोर लपून बसल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यांच्या दिशेने जात असताना दरोडेखोरांनी पोलिसांना पाहताच मिळेल त्या दिशेला धूम ठोकली. पोलिसांनी पाठलाग करून  शुभम काळे व बाळू काळे यांना पकडून जेरबंद केले. 

बातम्या आणखी आहेत...