जयंत पाटील म्हणाले, / जयंत पाटील म्हणाले, राजीनाम्याचे काम सत्ताधाऱ्यांचे; चिकटगावकर म्हणाले, मी राजीनामा देतोय, पक्षाने क्षमा करावी!

- विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा देण्यपूर्वी पक्षाचे राज्य प्रमुख जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधून राजीनामा देण्याविषयी चर्चा केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मला आमदारपदाचा राजीनामा देण्याचे काम सत्ताधारी पक्षाचे आहे. त्यांनी आरक्षणाचा विषय चिघळत ठेवला आहे. आपण विरोधी पक्षाचे सदस्य आहात असे सांगितले. मात्र मराठा आरक्षणासाठी प्राणाची आहुती दिलेला युवक काकासाहेब शिंदे हा तरुण माझ्या मतदार संघातला आहे. आरक्षणासाठी त्याचा बळी गेल्याचे मला दुःख झाले असून आमदारकी पेक्षा समाज मोठा असल्याची भूमिका समजावून सांगत राजीनामा देणे आवश्यक असल्याचे पटवून दिले.

दिव्‍य मराठी वेब टीम

Jul 26,2018 08:36:00 AM IST

वैजापूर- विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा देण्यपूर्वी पक्षाचे राज्य प्रमुख जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधून राजीनामा देण्याविषयी चर्चा केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मला आमदारपदाचा राजीनामा देण्याचे काम सत्ताधारी पक्षाचे आहे. त्यांनी आरक्षणाचा विषय चिघळत ठेवला आहे. आपण विरोधी पक्षाचे सदस्य आहात असे सांगितले. मात्र मराठा आरक्षणासाठी प्राणाची आहुती दिलेला युवक काकासाहेब शिंदे हा तरुण माझ्या मतदार संघातला आहे. आरक्षणासाठी त्याचा बळी गेल्याचे मला दुःख झाले असून आमदारकी पेक्षा समाज मोठा असल्याची भूमिका समजावून सांगत राजीनामा देणे आवश्यक असल्याचे पटवून दिले. दरम्यान आमदार पदाचा राजीनामा दिल्यामुळे पक्षाने मला क्षमा करावी, असे चिकटगावकरांनी सांगितले.


राज्यातील तमाम मराठा बांधवांच्या मराठा आरक्षण मागणीची सहनशीलता संपल्याची जाणीव काकासाहेब शिंदे या तरुणाने आपल्या बलिदानाने करून दिल्याने मराठा समाजाच्या स्वाभिमानासाठी वैजापूर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील एकमेव आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी बुधवारी सायंकाळी केली. गुरुवारी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन
तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाज बांधवांनी आरक्षण लागू करावे या मागणीसाठी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या ठिकाणी सायंकाळी सात वाजता आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर निवडक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह दाखल झाले. वैजापूर विधानसभा मतदारसंघातील कानडगाव येथील तरुण काकासाहेब शिंदे या तरुणाने मराठा आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी सोमवारी गोदावरी नदी पात्रात जलसमाधी घेऊन बलिदान दिले. या घटनेमुळे माझ्या मतदारसंघातील तरुण आरक्षणासाठी शहीद झाल्याचे मला अतिव दु:ख झाले. राज्यातील तमाम मराठा बांधवांचा आरक्षण प्रश्न प्रलंबित पडला आहे. शिंदे यांच्या बलिदानामुळे मराठा समाजाच्या स्वाभिमानासाठी आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे आमदार चिकटगावकर यांनी सांगितले.


सोशल मीडियावर राजीनाम्याची मागणी
आज सकाळपाासून सोशल मिडीयावर कानउगावच्या काही तरूणांनी एक क्लिप वायरल केली होती. जर मराठा समाजाला आरक्षण मिळत नसेल तर आपण पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी होत होती.


आंदोलकाने केली मागणी
दरम्यान आमदार भाऊसाहेब चिकटगावकर हे तहसील समोर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलन स्थळी दाखल झाले असता एकाने आपण राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती.


या सर्व बाबींचा आढावा घेत आ. चिकटगावकर यांनी त्वरीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पंचायत समितीत बैठक घेऊन राजीनामा देण्याविषयी चर्चा केली व निर्णय घेत पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर केला.


या वेळी तालुकाध्यक्ष बाळासाहेब भोसले, बाजार समितीचे माजी उपसभापती, उपसभापती प्रभाकर पा.बारसे, भागीनाथ मगर, पंचायत समितीचे माजी उपसभापती अॅड. प्रताप निंबाळकर, पंचायत समिती सदस्य राजेंद्र मगर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय पाटील चिकटगावकर, उत्तम निकम, माजी जिल्हा परिषद सदस्य सूरज पवार, बाजार समितीचे संचालक राजेंद्र कराळे, सागर गायकवाड, प्रेम राजपूत, बापू साळुंके, गणेश पवार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होती.


गुरुवारी विधानसभा अध्यक्ष बागडेंची भेट घेणार
मराठा समाजाच्या स्वाभिमानाच्या लढाईत, आरक्षणाच्या मागणीसाठी सातत्याने अन्यायाची झळ सोसणाऱ्या मराठा समाजापेक्षा आमदारपद मोठे नाही. विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठी किंवा नेत्याकडे देण्याचा दिखाऊपणा न करता गुरुवारी विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन राजीनाम्याची प्रत त्यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकरांनी स्पष्ट केले.


सकल मराठा समाजाने आमदारांचे मानले आभार
मराठा समाजाच्या न्याय्य हक्काच्या आरक्षण मागणीला वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे सदस्य आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी मराठा समाजाच्या अस्मितेच्या प्रश्नावर बुधवारी पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या भूमिकेमुळे आरक्षण आंदोलनाला व्यापक बळ मिळाले असल्याची प्रतिक्रिया सकल मराठा समाजाचे संयोजक धनंजय धोर्डे यांनी दिली.सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलनाला पाठबळ दिल्याबद्दल आभार मानले.


पदाधिकाऱ्यांशीही केली चर्चा
कानडगावच्या काही तरूणांनी सोशल मिडीवावर केलेल्या राजीनाम्याची मागणी व आंदोलनस्थळी भेटीदरम्यान एकाने केलेल्या मागणीमुळे उद्रक होण्याच्या शक्यतेनेच पक्षश्रेष्ठी व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत तासाभरातच निर्णय घेतल्याची गावात चर्चा.

पुढील स्‍लाइडवर वाचा, भाऊसाहेब चिकटगावकर यांचा राजीनामा...

सरकार तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण लागू करू शकते. मात्र सरकारची तशी इच्छा दिसत नाही, असे सांगत कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

सरकार तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण लागू करू शकते. मात्र सरकारची तशी इच्छा दिसत नाही, असे सांगत कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
X
COMMENT