Home »Maharashtra »Marathwada »Aurangabad» Verul Ghat 4 Hours Jam Due To Truck Accident

ओव्हरटेकच्या नादात ट्रॅव्हल्सची टेम्पोला धडक, वेरुळ घाट 4 तास जाम

प्रतिनिधी | Apr 11, 2018, 02:24 AM IST

  • अपघातानंतर तब्बल चार तास घाट जाम झाल्याने वाहनांच्या दूरवर रांगा लागल्या हाेत्या. छाया : वैभव किरगत

वेरूळ-सोलापूर-धुळे महामार्गावर वेरुळ येथील एक नंबर लेणीच्या बाजूस मंगळवारी सकाळी ११:३० वाजता ट्रॅव्हल्स बस व टेम्पो यांचा अपघात होऊन टेम्पो चालक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर बस रस्त्यावर अाडवी झाली तर चालक फरार झाला. गाडीतील महिलांना केवळ कर्नाटकी भाषा येत असल्याने गर्दी बघून त्यांनी बसचा दरवाजा आतून लावून घेतला.


पोलिस येताच कर्नाटकी भाषेत आम्हाला मारू नका, आमचा दोष नाही असे म्हणत त्या रडू लागल्या. यात सुमारे ४ तास वेरूळ घाट जाम झाला. शिर्डी, वेरुळ दर्शन घेऊन अजिंठा लेणीच्या दिशेने निघालेल्या म्हैसूर येथील ट्रॅव्हल्स (केए १४ ए २५०२) व कागजीपुरा येथून विटा घेऊन येणाऱ्या टेम्पोची (एमएच २३-२१५२) घाटात समोरासमोर धडक झाली. अपघातात टेम्पो चालक मोहम्मद सोफीयाना मोहम्मद रिझवान (कागजीपुरा) गंभीर जखमी झाला. त्याचा १ मे राेजी निकाह अाहे. या वेळी पोलिस पाटील रमेश ढिवरे, स. पो. नि. दुर्गेश राजपूत, अनिलकुमार बेंद्रे, वाल्मीक कांबळे, बाबासाहेब थोरात, इमरान सय्यद, महामार्ग स. पो. नि. नामदेव चव्हाण, संजय धोटे, बालू मोरे, भगवान पवार, यांनी वाहने बाजूस करीत वाहतूक सुरळीत केली. फरार चालकाला पाेलिसांनी लेणी परिसरातून ताब्यात घेतले.

पुढील स्‍लाइडवर...घाटातील लिंबाच्या झाडामुळे अपघात...

Next Article

Recommended