आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्याेगांकडून कर वसुलीचे ग्रा.पं.चे अधिकार काढणार, उद्याेगमंत्री देसाई यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/ अाैरंगाबाद - लघु उद्याेजकांना भूखंड देण्यापेक्षा त्यांना तयार गाळ्यांची विक्री केली जाईल किंवा परवडणाऱ्या दराने भाड्याने दिले जातील. तसेच अाैद्याेगिक क्षेत्राच्या हद्दीत असलेल्या ग्रामपंचायतींकडे असलेला उद्याेगांकडून कर वसूलीचा अधिकार काढून घेतला जाईल. यापुढे फक्त एमअायडीसीच कर वसूल करेल व त्यापैकी ५० टक्के रक्कम संबंधित ग्रामपंचायतींना देईल, अशी माहिती उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांनी साेमवारी विधान परिषदेत दिली.  


औद्योगिक क्षेत्राच्या सध्याच्या परिस्थितीसंदर्भात भाई जगताप यांनी मांडलेल्या प्रस्तावावर ते बाेलत हाेते. या चर्चेत सहभागी अामदार सतीश चव्हाण म्हणाले, ‘ग्रामपंचायती रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा, साफसफाई अशा कोणत्याही सुविधा उद्याेगांना पुरवत नाहीत, मात्र कर वसुली करतात. हा कर रद्द करण्यात यावा.’

बातम्या आणखी आहेत...