आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

६७ घरफोड्या करणारा वॉन्टेड आरोपी रईस बोक्याला अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ६७ घरफोड्या करणारा तसेच जालना, कन्नडसह अनेक जिल्ह्यांतील पोलिसांना हवा असलेला रईस हनीफ मोहंमद ऊर्फ बोक्या (२८, रा. गरम पाणी) याला क्रांती चौक पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याच्याकडून दुचाकी व चोरलेला मोबाइल जप्त करण्यात आला. 


बोक्या गँगमधील दोघांना यापूर्वीच अटक करण्यात आले होते. मुख्य आरोपी बोक्या हा मंगळवारी बसस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक कैलास पवार आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. मागील पाच दिवसांत पोलिसांनी अनिस बोक्या, अश्फाक बोक्या यांना अटक केली. रईसने कन्नडमध्ये एक मोबाइल दुकान फोडून ४० मोबाइल चोरल्याचे पोलिसांना सांगितले. शहरात आतापर्यंत ६७ घरे फोडल्याचे तो सांगतो. पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कैलास पवार, राजेश फिरंगे, गजानन मांटे, अनिल इंगोले, संतोष रेड्डी, राजेश चव्हाण, गणेश वाघ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...