आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलतज्ज्ञ माधवराव चितळे महाराष्ट्र सोडून इंदूरला होणार स्थायिक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांनी २० वर्षांच्या वास्तव्यानंतर औरंगाबादच नव्हे तर महाराष्ट्र सोडण्याचा निर्णय घेतला असून सप्टेंबरपासून ते इंदूरला वास्तव्य करणार आहेत. त्यामुळे सहज उपलब्ध होणारी महाराष्ट्रातील एक मोठी बौद्धिक संपदा आता मध्य प्रदेशाचाही अभिमान वाढवणार आहे.

 

डिसेंबर १९९७ मध्ये आंतरराष्ट्रीय जलसिंचन व जलनिस्सारण आयोगाच्या महासचिव पदावरून निवृत्त झाल्यानंतर चितळे यांनी मुद्दाम औरंगाबादची निवड आपल्या वास्तव्यासाठी केली होती. तेव्हापासून जानेवारी १९९८ पासून ते इथे राहत होते. "जागतिक पाणी भागीदारी' या आंतरराष्ट्रीय संस्थेने त्यांना दक्षिण आशियाचे अध्यक्ष केले आणि दिल्लीत वास्तव्य करण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी नकार दिल्याने या संस्थेचे कार्यालय वाल्मीत सुरू करण्यात आले. राजीव गांधी, पी.व्ही.नरसिंहराव यांच्यासह चार पंतप्रधानांसोबत काम केलेल्या चितळे यांनी केंद्रीय जलआयोगाचे अध्यक्ष तसेच केंद्रीय जलसंपदा सचिव म्हणूनही काम केले. वयाची ८० वर्षे पूर्ण केल्यानंतर ते आता मुलीकडे इंदूरला स्थायिक होणार आहेत.

 

मराठवाड्याने प्रेम दिले
मराठवाड्यातील लोकांनी प्रेम दिल्यानेच एवढे काम करणे शक्य झाल्याचे चितळेंनी 'दिव्य मराठी'ला सांगितले. मराठवाड्याची बौद्धिक संपदा इंदूरला जाते आहे. त्यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या व्यक्तीने दिल्ली-मुंबईपेक्षा औरंगाबादमध्ये राहणे हेच मुळी औरंगाबादकराचे भाग्य होते. त्यांच्या शिफारशींची अंमलबजावणी झाली तर मराठवाडा सुजलाम सुफलाम होईल, असे मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य शंकरराव नागरे म्हणाले.

 

बातम्या आणखी आहेत...